शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

‘वालधुनी’च्या विकासाचे घोडे अडलेलेच

By admin | Updated: March 14, 2017 01:33 IST

सर्वाधिक प्रदूषित असलेली वालधुनी नदी मिठी नदीच्या धर्तीवर पुनरूज्जीवित करण्याचा प्रकल्प सरकार दरबारी निधीअभावी रखडला आहे.

मुरलीधर भवार , कल्याणसर्वाधिक प्रदूषित असलेली वालधुनी नदी मिठी नदीच्या धर्तीवर पुनरूज्जीवित करण्याचा प्रकल्प सरकार दरबारी निधीअभावी रखडला आहे. वालधुनी विकासाविषयी १० वर्षांपासून केवळ चर्चेचे गुऱ्हाळ आणि कागदी घोडे नाचवण्यात सरकारी यंत्रणा व लोकप्रतिनिधी धन्यता मानत आहेत. दुसरीकडे वालधुनीची प्रदूषण रोखण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळानेही ठोस कार्यवाही केलेली नाही. नदीचा नाला झाला असून, नाल्याच्या किनारी राहणाऱ्यांना नाक मुठीत धरुन जगावे लागत आहे. वालधुनी नदी ही सह्याद्रीच्या फूट हिल्समधून उगम पावते. ती ३१ किलोमीटरपर्यंत वाहाते. तिच्या तीरावर अंबरनाथचे पुरातन शिवमंदिर आहे. या नदीच्या काठावर पुढे अंबरनाथची औद्योगिक वसाहत वसली. या नदीपात्रात सांडपाणी, मूलमूत्र आणि रासायनिक कंपन्यांचे प्रक्रिया न केलेले रसायनमिश्रित पाणी सोडले जाते. नदीच्यालगत जीन्स कपड्यावर प्रक्रिया करणारे कारखाने आहेत. त्यांचे रासायनिक पाणीही नदीत सोडले जाते. भंगार गोळा करणाऱ्यांची गोदामेही नदीकिनारी आहेत. नदीपात्रात प्रचंड अतिक्रमणे झाली आहेत. या नदीच्या पुनरूज्जीवनाचा मुद्दा प्रकर्षाने २००५ मधील अतिवृष्टीवेळी समोर आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मिठी नदीच्या धर्तीवर वालधुनीच्या विकासाची घोषणा केली. मात्र, त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही. आघाडी सरकारच्या वेळी वालधुनी नदी विकास करण्याची मानसिकता नसल्याची टीका शिवसेना-भाजपाने केली. आता शिवसेना-भाजपाचे सरकार सत्तेवर येऊन अडीच वर्षे उलटून गेली तरी वालधुनीच्या विकासावर त्यांनी कोणतीही भूमिका अद्याप घेतलेली नाही. वालधुनी नदी विकासाचा सविस्तर अहवाल व आराखडा कल्याण-डोंबिवलीचे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी २०११ मध्ये तयार करून राज्य सरकारकडे सादर केला होता. ६५० कोटींचा विकास आराखडा सरकार दरबारी पडून आहे. महापालिकेकडे नदी विकासासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी नव्हता. तसेच महापालिका कर्ज घेण्यास तयार नव्हती. एमएमआरडीएने कर्जाचा प्रस्ताव ठेवला होता. राज्य सरकारने निधी देण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. या जंजाळात योजना पडून राहिली.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वालधुनीच्या विकासाविषयी एमएमआरडीए विचारणा केली होती. त्यावेळी हा प्रकल्प निधीअभावी गुंडळाल्याची माहिती एमएमआरडीएने दिली. त्यामुळे हा प्रश्न खासदारांनी संसदेच्या अधिवेशनात उपस्थित केला. केंद्राकडून निधीची मागणी केली होती. कल्याण पश्चिमेचे भाजपा आमदार नरेंद्र पवार यांनीही वालधुनी नदी विकासाचा प्रश्न अर्थसंकल्पी अधिवेशनात उपस्थित केला. पण कामकाज तहकूब झाल्याने वालधुनीच्या प्रश्नावर चर्चाच झालेली नाही. पवार यांनी वालधुनीचा विकास मिठीच्या धर्तीवर करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, २०११ मधील ६५० कोटींचा हा खर्च आता ९०० कोटींच्या घरात पोहोचला आहे. हा निधी सरकारने उपलब्ध करून द्यावा, असे पवार यांचे म्हणणे आहे. वालधुनी नदी विकासासाठी महापौर राजेंद्र देवळेकर देखील आग्रही होते. तसेच शिवसेना गटनेते रमेश जाधव यांनी दोन वेळा नदीपात्रात उपोषण केले होेते. २०१४ मध्ये केंद्राच्या पर्यावरण खात्याने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, वालधुनी ही सर्वाधिक प्रदूषित नदी आहे. ही नदी कल्याण खाडीला जाऊन मिळते. वालधुनीमुळे कल्याण खाडी डेड झोन होते आहे. अंबरनाथ नगरपालिका व उल्हासनगर महापालिका या वालधुनी विकासाविषयी उदासीन असल्याचे चित्र आहे.वालधुनीच्या प्रदूषित पाण्याला उग्र रासायनिक वास येतो. रात्रंदिवस अंबरनाथच्या नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होतो. याबाबतची तक्रार सिटीझन फोरमचे सत्यजीत बर्मन यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नद्यांच्या पुनरूज्जीवनाबाबत पर्यावरण सुरक्षा समितीच्या याचिकेवर २०१२ रोजी निकाल दिला आहे. त्यात अनेक सूचना केल्या आहेत. त्या वालधुनीलाही लागू होतात, याकडे बर्मन यांनी लक्ष वेधले आहे. कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया योग्य प्रकारे झाली पाहिजे. कारखानदारांनी त्यांच्या स्वत:चा सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारला पाहिजे. तसेच कारखानदारी संघटनांनी सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारले पाहिजे. त्यासाठी केंद्राकडून ५० टक्के, राज्याकडून २५ टक्के निधी मिळू शकतो. तसेच २५ टक्के खर्चाची उभारणी स्वत: कारखानदारांनी करावी. न्यायालयाच्या आदेशानंतर सहा महिन्यांत त्याची अंमलबजावणी सुरू करून प्रकल्प तीन वर्षांत कार्यान्वित व्हावा, असे त्यात म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाची अंमलबजावणीच अद्याप झालेली नाही. ‘वनशक्ती’च्या याचिकेवर सुनावणी करताना राष्ट्रीय हरित लवादाने कारखानदार, स्थानिक स्वराज्य संस्था, एमआयडीसी यांना एकूण ९५ कोटींचा दंड सुनावला होता. त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. हे प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी करण्यासाठी पुन्हा उच्च न्यायालयाकडे पाठवले. वनशक्ती पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. ९५ कोटी दंडाच्या रक्कमेतून नदी विकास करण्याचे लवादाने म्हटले होते. त्यात वालधुनी व उल्हास नदीचा समावेश आहे. हे प्रकरणही न्यायप्रविष्ट आहे.