शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

देवमासा अखेर गेला देवाघरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2015 01:38 IST

अलिबाग-रेवदंडा समुद्रकिनाऱ्याजवळ जखमी अवस्थेत वाहत आलेला ४२ फुटी महाकाय देवमासा अखेर गुरुवारी मृत्युमुखी पडला

अलिबाग : अलिबाग-रेवदंडा समुद्रकिनाऱ्याजवळ जखमी अवस्थेत वाहत आलेला ४२ फुटी महाकाय देवमासा अखेर गुरुवारी मृत्युमुखी पडला. रेवदंडा येथील समुद्र परिसरात त्याच्यावर जिल्हा प्रशासनाकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. रात्रीपासून देवमाशाला वाचविण्यासाठी प्रशासनाच्या सर्वच विभागांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र अखेर देवमासा देवाघरी गेला.अलिबागपासून श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत असे महाकाय मासे सतत आढळतात. बुधवारी दुपारी रेवदंडा पूल आणि आगरकोट किल्ला यांच्यामध्ये असणाऱ्या समुद्रकिनारी सुमारे ४२ फुटांचा महाकाय मासा आल्याची वार्ता रेवदंडा गावात पसरली. त्यावेळी अलिबाग वन खात्यातील कर्मचाऱ्यांनी माशाला समुद्रात ढकलण्याचे प्रयत्न केले. मात्र मासा मोठा असल्याने त्यांना यश आले नाही. त्यानंतर तातडीने याची माहिती अलिबाग येथील कस्टम आॅफिसचे निरीक्षक मनोज आढाव यांना पत्रकारांनी दिली. त्यांनी तत्परतेने मुरुड येथील कोस्ट गार्ड कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी जे. पी. यादव यांच्याशी संपर्क साधला. यादव यांनी तातडीने बचाव कार्यासाठी टीम तयार केली. हावरक्राफ्ट बेलापूर येथे असल्याने घटनास्थळी पोचले नाही. त्यानंतर रात्री उशिरा जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.अलिबागचे प्रांत दीपक क्षीरसागर, तहसीलदार व इतर कर्मचारी, तसेच कोस्ट गार्ड, मत्स्य व्यवसाय विभाग, वन विभाग, पशुवैद्यकीय विभाग, पोलीस विभाग, मेरीटाइम बोर्ड आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने क्रे न, मोठे दोरखंड, मोठे जहाज आदींचा वापर करून या देवमाशाला खोल समुद्रात नेऊन सोडण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. यासाठी उरणच्या नागरी सुरक्षा दलाने विशेष मदत केली. परंतु त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. शेवटी गुरुवारी सकाळी हा मासा मृत्युमुखी पडलाजिल्हा प्रशासनाच्या वतीने निर्णय घेऊन रेवदंडा बीच परिसरात मोठा खड्डा तयार करून पशुवैद्यकीय व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार रासायनिक पदार्थांचा वापर करून माशावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)