शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

उत्पादन चांगले येऊनही शेतकऱ्याच्या हाती राहिली फक्त केळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 01:16 IST

लॉकडाऊनचा फटका : बाजारपेठा बंद, कंपन्यांनी फिरवली पाठ, गेल्यावर्षी नोकरी गेल्याने तो वळला शेतीकडे 

लोकमत न्यूज नेटवर्ककिन्हवली : डोळखांब परिसरातील गणेश उमवणे या युवा शेतकऱ्याने आजोबा पर्वताच्या पायथ्याशी तांत्रिक शेती करत केळीची लागवड केली आणि उत्पादनही चांगले आले. चार लाखांचे उत्पन्न अपेक्षित असताना मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन लागल्याने बाजारपेठा बंद व कंपन्यांनी पाठ फिरविल्याने केळीची विक्री होऊ शकली नसल्यामुळे शेतकऱ्याच्या हातात केळीच शिल्लक राहिली आहेत.गणेश उमवणे हा युवक वाहनचालक म्हणून ऐरोली येथे कामाला होता. मात्र मागील वर्षी कोरोनामुळे नोकरी गेली. घरात दहा माणसांचे कुटुंब. त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने आपल्या भावाला सोबत घेऊन वालशेत या गावात शेणखत आणून जमीन मशागत केली. एक एकर जागेत कोल्हापूरहून जी-९ जातीच्या सुमारे १२०० रोपांची लागवड केली. त्यासाठी त्याने बोअरवेल करून ठिबक सिंचनाची व्यवस्थाही केली.दहा महिन्यांनी केळी पीक तोडणीला आले. केळीचा एक धड साधारण ३५ किलो असून हजार झाडांचे ३५ प्रमाणे ३५ हजार किलो केळी निघाली. त्यातून चार लाख उत्पन्न अपेक्षित होते व त्यामध्ये खत, पाणी, औषधे व मजुरी खर्च वजा जाता निव्वळ तीन लाख रुपये नफा मिळाला असता. उत्पादन चांगले येऊनही कोरोनाच्या अस्मानी संकटात लॉकडाऊन लागल्यामुळे बाजारपेठ बंद राहिल्याने केळीला ग्राहक नसल्यामुळे केळी घरातच आहेत. आणखी १० ते १५ दिवसांनी ७०० ते ८०० केळीचे घड मिळणार असल्याचे गणेशने सांगितले.

कर्ज काढून केळी लागवडीचा पहिलाच प्रयोग केला आणि तो यशस्वीही झाला. मात्र, लॉकडाऊनमुळे बाजारपेठ व फळांची दुकाने बंद राहिल्याने खूप नुकसान झाले आहे. आता आहे त्या जमिनीची विक्री करून कर्ज फेडण्याशिवाय पर्याय राहिला नाही.    -गणेश उमवणे,     युवा शेतकरी 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या