शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

दगडी पाटे-वरवंटे ग्रामीण भागातूनही हद्दपार

By admin | Updated: April 4, 2016 02:00 IST

शहरातून दगडी पाटे-वरवंटे केव्हाच गायब झाले व त्यांची जागा मिक्सर, फूड प्रोसेसर यांनी घेतली. धान्य दळण्याची जाती तर इतिहासजमा झाली. आता पॅकबंद आटा घरोघरी वापरला जातो.

सुधाकर वाघ,  धसईशहरातून दगडी पाटे-वरवंटे केव्हाच गायब झाले व त्यांची जागा मिक्सर, फूड प्रोसेसर यांनी घेतली. धान्य दळण्याची जाती तर इतिहासजमा झाली. आता पॅकबंद आटा घरोघरी वापरला जातो. मात्र, ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातूनही पाटे-वरवंटे हद्दपार झाले आहेत. येथील आठवडाबाजारात त्यांची मागणी पूर्णपणे घटली आहे.ग्रामीण भागातही वीजपुरवठ्याची परिस्थिती सुधारल्याने आणि वेगवेगळ्या कंपन्यांनी मिक्सर वापरण्याची सुविधा उपलब्ध केल्याने या भागात पाटे-वरवंटे वापरणे बंद झाले आहे. शहरात पिठाच्या चक्क्यांमधून धान्य दळून आणण्याची पद्धत सुरू झाल्यापासून जाती इतिहासजमा झाली. आता अनेक घरांत पॅकबंद आटा, बेसन यांचा वापर केला जातो. ग्रामीण भागातही हेच लोण पसरू लागल्याने तेथील जाती वापरणे थांबले आहे.मुरबाड तालुक्यातील सरळगाव हे आठवडाबाजाराचे ठिकाण आहे. या ठिकाणी दर मंगळवारी हा बाजार भरतो. भाजीपाला तसेच जनावरे विक्र ीसाठी येतात. आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी परिसरातील लोक या बाजारात गर्दी करतात. पूर्वी या बाजारात अनेक लोक दगडी पाटे-वरंवटे विकत घेऊन जात. मात्र, आता ते खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे या बाजारात येणारे कारागीर सांगतात.हल्ली त्यांची मागणी खूप कमी झाली आहे. दिवसभर उन्हातान्हात बसून पाटे-वरवंटे तयार केले तरी त्यांची विक्री होत नाही. आतापर्यंत याच गोष्टी विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला, अशी माहिती अर्जुन जाधव यांनी दिली. यापुढे लोकांना पाटे-वरवंटे वापरायचे नसतील तर माझ्या व माझ्या कुटुंबाच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, असेही ते म्हणाले.ग्रामीण भागातील काही महिलांना याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, पाट्या-वरवंट्यावर वाटण करण्यापेक्षा मिक्सरमध्ये करणे अधिक सोयीचे आहे. शिवाय, स्वच्छतेच्या दृष्टीनेही ते अधिक गरजेचे आहे. सध्या घरात असलेले पाटे-वरवंटे वापराविना पडून असल्याने त्याला टाकी लावून घेण्याचा किंवा नव्याने खरेदी करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. यामुळे हे पारंपरिक व्यवसाय लोप पावण्याची भीती आहे.