शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

‘सीआरझेडच्या जागेसंदर्भात निर्णय घ्या’

By admin | Updated: March 14, 2017 01:34 IST

मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडी पुलाच्या कामाचे भूमीपूजन होऊन पाच महिने उलटले तरी अजूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.

डोंबिवली : मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडी पुलाच्या कामाचे भूमीपूजन होऊन पाच महिने उलटले तरी अजूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. पुलासाठी सीआरझेडमधील जमीन संपादनचा अडसर कायम आहे. या संदर्भात लवकर निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव केडीएमसीने एमएमआरडीएकडे सादर केला आहे. या बाबत गुरुवारी एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांच्याकडे बैठक झाली. त्यात सीआरझेड जमीन संपादनाविषयी सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला जाईल, असे दराडे यांनी स्पष्ट केले.एमएमआरडीएतर्फे २२६ कोटी खर्चून बांधण्यात येणाऱ्या या सहा पदरी पुलाच्या कामाचे भूमीपजून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १८ सप्टेंबर २०१६ ला झाले. याच कामाच्या भूमिपूजनावरून शिवसेना-भाजपा आमने सामने आली होती. मुख्यमंत्र्याच्या हस्ते भूमीपूजन होण्यापूर्वीच शिवसेनेने त्याचे भूमीपूजन करून राजकीय धुराळा उडवून दिला होता. या कामाचे भूमीपूजन होऊन पाच महिने झाले तरी अद्याप कामाला एक इंचही सुरुवात झालेली नाही. पुलाच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य येऊन पडले आहे. मात्र, पुलासाठी डोंबिवलीकडील ठाकुर्ली मोठागावची जागा व पुलाच्या पलिकडे भिवंडी भागातील जागा अद्याप संपादित झालेली नाही. काही जागा ही सीआरझेडमध्ये येते. शेतकऱ्यांनी जमीन संपादनाला विरोध केला आहे. जमीन संपादित केलेली नसताना कामाचे भूमीपूजन लवकर उरकले गेले. त्यामुळे काम रखडले आहे. महापालिका आयुक्तांनी जमीन बाधितांना नोटिसा पाठवल्या आहेत. बाधितांना मोबदला हवा आहे. आयुक्तांच्या मते बाधितांनी प्रथम जमीन द्यावी. मग मोबदल्याचा विचार केला जाईल. तर एमएमआरडीएच्या मते आम्ही प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. कंत्राटदार नेमला आहे. जमीन संपादन हा भाग महापालिकेचा आहे. (प्रतिनिधी)