शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

रस्त्यावरील शेवाळामुळे तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:28 IST

मुंब्रा : पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर जमा झालेल्या शेवाळावरून सायकल घसरल्यामुळे झालेल्या अपघातात अशरफ शेख (१८) या तरुणाचा मृत्यू झाल्याची ...

मुंब्रा : पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर जमा झालेल्या शेवाळावरून सायकल घसरल्यामुळे झालेल्या अपघातात अशरफ शेख (१८) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. तो मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळील बॉम्बे कॉलनीतील वसीम अपार्टमेंट या इमारतीमध्ये राहत होता. मंगळवारी रात्री तो गावदेवी वसाहत ते सम्राटनगरच्या दरम्यान असलेल्या रस्त्यावरून सायकलवरून सम्राटनगरच्या दिशेने येत होता. येथील रस्त्यावरून वाहत असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर जमा झालेल्या शेवाळामुळे रस्ता निसरडा झाल्याने त्याची सायकल घसरली. यामुळे संतुलन बिघडल्याने तो रस्त्याच्या जवळ असलेल्या विद्युतखांबांवर जाऊन आदळला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा घटनास्थळावर मृत्यू झाला. दरम्यान, पावसाळ्यामध्ये येथील रस्त्यावरून जाणारे पादचारीदेखील पाय घसरून पडून जखमी होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे रस्त्यावर येणारे डोंगराच्या पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा व्हावा, पाणी रस्त्यावर येऊ नये, यासाठी रस्त्याच्या खालून पाइप टाकण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.