शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील दोघांचा मृत्यू

By admin | Updated: February 29, 2016 04:34 IST

या हत्याकांडात भिवंडी तालुक्यातील तीन जणांचा समावेश आहे. त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला असून, एक महिला ठाण्यातील खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

पंढरीनाथ कुंभार,  भिवंडीया हत्याकांडात भिवंडी तालुक्यातील तीन जणांचा समावेश आहे. त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला असून, एक महिला ठाण्यातील खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. तालुक्यातील म्हापोली येथे राहणाऱ्या सोजब नुरा भरमल याच्याबरोबर कासारवडवली येथील वरेकर कुटुंबातील सुबीयाशी दोन वर्षांपूर्वी लग्न झाले असून, त्यांना अरसीया नावाची ४ महिन्यांची मुलगी होती. सोजब याच्या कुटुंबाचे शहरातील वंजारपाटी नाक्यावर फुलांचे दुकान तसेच म्हापोली गावात मोबाइलचे दुकान आहे. सोजबचे वडील वारले असून आई, चार भाऊ व दोन बहिणी असा त्याचा परिवार आहे. सोजब व सुबीया यांचा मुलीसह सुखाचा संसार सुरू होता. शनिवारी रात्री ८ वाजता सुबीयाचा भाऊ तथा हत्याकांडातील मारेकरी हुसनैन अन्वर वरेकर हा म्हापोली येथे सोजब भरमल याच्या घरी आला. त्याने कासारवडवली येथील घरात दावत ठेवली असून तुला घेण्यास आलो आहे, असे सांगून सोबत आणलेल्या गाडीत बहीण सुबीया व तिची ४ वर्षांची मुलगी अरसीया हिला घेऊन गेला. त्यानंतर, रात्री २ ते ३ च्या दरम्यान ही घटना झाल्याचे सोजब यास समजले. तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी ठाण्यात धाव घेतली.लहान मुलगी अरसीया हिचा गळा चिरल्याने मृत्यू झाल्याचे त्यास समजले. तर, पत्नी सुबीया हिचा गळा चिरल्याने ती गंभीररीत्या जखमी असून, मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती सोजबला मिळाली. सध्या तिच्यावर ठाण्यातील टायटन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोजब भरमाल याने मयत मुलगी अरसीया हिचे पार्थिव रविवारी दुपारी दीड वाजता म्हापोली येथे आणल्यानंतर सायंकाळी ५ वाजता दफनविधी करण्यात आला.