शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

‘बंडखोरांना लाथ मारण्याची हिम्मत केवळ सेनेतच’

By admin | Updated: February 14, 2017 02:56 IST

शिवसेनेने सत्तेची पर्वा कधीच केली नाही. निवडणूक १० दिवसांवर आलेली असताना २६ बंडखोरांना लाथ मारून हाकलून देण्याची हिम्मत केवळ शिवसेनाच दाखवू शकते

ठाणे : शिवसेनेने सत्तेची पर्वा कधीच केली नाही. निवडणूक १० दिवसांवर आलेली असताना २६ बंडखोरांना लाथ मारून हाकलून देण्याची हिम्मत केवळ शिवसेनाच दाखवू शकते, असे पक्षाचे उपनेते अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले. कमळ चिखलात उगवते आणि सत्तेच्या सिंहासनावर बसण्यासाठी ज्यांनी आपल्यासाठी चिखल तुडवला, त्यांना आज भाजपा विसरली असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली. निवडणुकीच्या निमित्ताने विटावा, मनीषानगर, वृंदावन येथील सभेत ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, केदार दिघे या वेळी उपस्थित होते. टी. चंद्रशेखर यांनी ठाण्यात अनधिकृत बांधकामांविषयी धडक मोहीम चालवली होती. त्या वेळी बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. सत्तेची ताकद प्रशासनाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहते, तेव्हाच शहरात विकासाची कामे होऊ शकतात आणि हेच शिवसेना करत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) तेव्हा मुख्यमंत्री कुठे होते मेट्रो प्रकल्प महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत नसताना आम्हाला ठाण्यात सत्ता द्या, मेट्रो प्रकल्प आणतो, हे मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या सभेत खरपूस समाचार घेतला. केंद्रात आणि राज्यात तुमचीच सत्ता आहे. मेट्रो आणायला तुम्हाला कोणी अडवले आहे, असा सवालही त्यांनी केला. दिव्यामध्ये केवळ ११ जागांसाठी मुख्यमंत्री दिव्यात येतात. दिवा जलद लोकलसाठी दिव्यात रेल रोको झाला, तेव्हा मुख्यमंत्री कुठे होते, असा सवालही त्यांनी केला.