शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात ४५ फुटांची संरक्षण भिंत कोसळल्याने तीन गाड्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:44 IST

ठाणे : इमारतीच्या कंपाऊंडची ४५ फुटांची संरक्षण भिंत आणि झाड त्या परिसरात उभ्या केलेल्या तीन गाड्यांवर पडल्याची घटना ...

ठाणे : इमारतीच्या कंपाऊंडची ४५ फुटांची संरक्षण भिंत आणि झाड त्या परिसरात उभ्या केलेल्या तीन गाड्यांवर पडल्याची घटना मध्यरात्री सोमवारी वागळे इस्टेट येथे घडली. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मंगळवारी दिवसभर शहरात पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. परंतु, सायंकाळी पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचेही दिसून आले.

वागळे इस्टेट, जुन्या पासपोर्ट ऑफिस जवळील अँफोटेक पार्कची सुमारे ४५ फुटांची संरक्षण भिंत व १ झाड सोमवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास त्या भिंतीलगत उभ्या केलेल्या तीन आलिशान चारचाकी वाहनांवर पडले. या संदर्भातील माहिती मिळताच ठामपा आपत्ती आणि अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत, गाड्यांवर पडलेले झाड कापून बाजूला केले. त्यातच रात्रीची वेळ आणि पाऊस सुरूच असल्याने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

४३ मिमी पावसाची नोंद

ठाणे शहरात दिवसभरात ४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच मंगळवारी सकाळपासून पाऊस पडत असल्याने दुपारपर्यंत सूर्यनारायणाचे दर्शन दुर्लभ झाले होते. तर आतापर्यंत शहरात १३०९.२६ मिमी नोंद झाली असून गतवर्षी याचदरम्यान १०९५.४४ मिमी पाऊस झाल्याची माहिती आपत्ती कक्षाने दिली.