शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात झाड आणि भिंत पडून सहा वाहनांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:41 IST

ठाणे : हरिनिवास आणि लोकपुरम येथे पडलेले झाड आणि सोसायटीच्या संरक्षित भिंतीमुळे या परिसरात उभ्या असलेल्या सहा आलिशान मोटारकारचे ...

ठाणे : हरिनिवास आणि लोकपुरम येथे पडलेले झाड आणि सोसायटीच्या संरक्षित भिंतीमुळे या परिसरात उभ्या असलेल्या सहा आलिशान मोटारकारचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे या दोन्ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास काही तासांच्या अंतरावर घडल्या. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकपुरम येथील ज्योतिर्मय या सोसायटीची ५० ते ५५ फूट उंच असलेली संरक्षक भिंत मंगळवारी पहाटे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळली. यावेळी त्या ठिकाणी उभ्या केलेल्या चार मोटारकारवर तिचा काही भाग कोसळल्यामुळे या वाहनांचेही मोठे नुकसान झाले. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. त्याचबरोबर दुसऱ्या एका घटनेत हरिनिवास सर्कल येथे अचानक वृक्ष उन्मळून पडण्याचीही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. हे झाडही त्या ठिकाणी उभ्या केलेल्या दोन मोटारकारवर पडले. त्यामुळे त्या वाहनांचेही नुकसान झाले. या घटनेतही कोणीही जखमी झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच रस्त्याला अडथळा होत असलेले झाडही तातडीने बाजूला केल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रभारी अधिकारी संतोष कदम यांनी दिली.