शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूत शिक्षकांची पगारवाढ झाली रद्द

By admin | Updated: May 29, 2017 05:46 IST

विषय शिक्षकांच्या मंजूर पदाच्या २५ टक्के पदांना वेतन्नोती देणे आवश्यक असताना २०१४ साली ठाणे जिल्हा परिषदेने सरसकट

अनिरु द्ध पाटील/  लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : विषय शिक्षकांच्या मंजूर पदाच्या २५ टक्के पदांना वेतन्नोती देणे आवश्यक असताना २०१४ साली ठाणे जिल्हा परिषदेने सरसकट सर्वच पदांना वेतन्नोती लागू करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. मात्र २०१६ साली प्राथमिक शिक्षण संचालनालयाने अतिरिक्त विषय शिक्षकांची वेतन्नोती रद्द केल्याने या तालुक्यातील १५१ शिक्षकांचे वेतन घटले असून आता ६ वी ते आठवीच्या जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवायचे कुणी असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच शिक्षकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.शिक्षण हक्क कायद्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इ. पहिली ते पाचवी व इ.सहावी ते आठवी अशा दोन स्तरावर अध्यापन चालते. बी.ए.बी.एड शिक्षकांना विषय शिक्षक या पदावर जुलै २०१४ मध्ये नेमणूक देऊन वेतन्नोती दिली होती. परंतु आता दोन वर्षानंतर डिसेंबर २०१६ मध्ये प्राथमिक शिक्षण संचालकांनी पत्राद्वारे असे कळविले की, जुलै २०१४ मध्ये शासनाची मान्यता न घेता व तसेच मंजूर पदाच्या २५ टक्के शिक्षकांना वेतन्नोती देणे आवश्यक असताना सरसकट सर्वांनाच ती दिली.ही अनियमितता दूर करण्यासाठी जिल्हा परिषदने या विषय शिक्षकांची वेतन्नोती एप्रिल २०१७ मध्ये काढून घेण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी अनिल सोनार यांनी कार्यवाही करून विषय शिक्षकांना उपशिक्षक पदावर आणून ठेवले आहे. मात्र पालघर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील विषयशिक्षकांची वेतन्नोती मात्र काढून घेतलेली नाही. त्यामुळे शाळा सुरु झाल्यावर इ. सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकविणार कोण? असा प्रश्न आहे. गुणवत्तापुर्ण अध्यापन करण्यासाठी विषयशिक्षकांची नेमणूक करण्याचे निकष असताना पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल डहाणू तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. फक्त डहाणू तालुक्यातच काइ. ९ वी च्या प्रवेशाचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर हा वर्ग जिल्हा परिषदेला जोडण्याचे धोरण आखले जात आहे. मात्र विषय शिक्षक शिक्षकांचे काय याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. तसेच या आदेशाची अंमलबजावणी फक्त डहाणू तालुक्यातच झाल्याने विषय शिक्षकात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.वरिष्ठ कार्यालयातून आलेल्या परिपत्रकाची अमलबजावणी केली असून, जिल्ह्यात ती अन्य तालुक्यातही होईल. -अनिल सोनार , गटशिक्षणाधिकारी , डहाणू पंचायत समिती शिक्षण विभाग