शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

सायबरच्या १,५०० तक्रारी

By admin | Updated: September 12, 2016 03:10 IST

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगारीकरिता करण्याच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाल्याने ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात २०१६ च्या पहिल्या केवळ सात

पंकज रोडेकर ,  ठाणेअत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगारीकरिता करण्याच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाल्याने ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात २०१६ च्या पहिल्या केवळ सात महिन्यांत सुमारे दीड हजार तक्रारी सायबर सेलकडे नोंदल्या आहेत. सोशल मीडियावर अश्लील चित्रफीत टाकणे, फेसबुकवरून धमक्या देणे या व अशा प्रकरणांत जवळचा नातेवाईक किंवा व्यक्ती गुंतल्याचे चौकशीत उघड झाल्यावर तक्रारदार पाठ फिरवतात, अशी खंत पोलिसांनी व्यक्त केली. मात्र असंख्य अडीअडचणींनंतरही मागील साडेतीन वर्षात ठाणे पोलिसांनी १७७ गुन्हे दाखल करून ३५ जणांच्या मुसक्या आवळल्याची माहिती सूत्रांनी दिली.शहर पोलीस आयुक्तालयात २०११ यावर्षी ३८१ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. २०१२ मध्ये ही संख्या दुप्पट होऊन ६१९ झाली तर २०१३ मध्ये १,०७१ झाली. २०१४ साली सुमारे १५०० तक्रारी प्राप्त झाल्या तर २०१५ मध्ये त्यामध्ये झापाट्याने वाढ होऊन २७४७ वर गेले. या वर्षात २०१६ मधील सात महिन्यात सुमारे १,५०० तक्रारी सायबर गुन्ह्यांसंदर्भात प्राप्त झाल्या आहेत. सर्वाधिक गुन्हे क्रेडीट-डेबीट कार्ड फ्रॉडचे असून त्यापाठोपाठ फेसबुक ,वेबसाईट, ई-मेल, धमकीचे मेल, अश्लिल एसएमएस, इंटरनेट बँकींग, लॉटरी , मोबाईल,आॅनलाईन नोकरी, कर्ज, इतर अशा तक्रारींचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. एखाद्या बँकेतून बोलत असल्याचे सांगून डेबीट-क्रेडीट कार्डाची माहिती घेण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. अशी माहिती देऊ नये. त्याबाबत बँकेत जाऊन खातरजमा करावी. तसेच फेसबुक यासारख्या सोशल मीडियाद्वारे तरूणाई नवीन मित्र शोधण्यास मग्न असते.यातून फसवणूकीच्या घटना वाढीस लागलेल्या दिसतात. इंटरनेट चॅटच्या माध्यमातून अनेक मित्रांशी ओळख झाली तरी त्यांना प्रत्यक्षात भेटणे टाळा तसेच आपल्या शाळेसह मोबाईल नंबर, फोटो, पत्ता इत्यादी माहिती टाकू नका. इंटरनेटचा वापर मर्यादीत ठेवा,अनावश्यक लिंकवर क्लिक करु नका. अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलमध्ये इंटरनेट असल्याने मोबाईल चोरीस गेल्यास त्याची तत्काळ तक्रार दाखल करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.