शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्हे जागृतीच्या सीडीचे प्रकाशन

By admin | Updated: May 23, 2017 01:25 IST

जिल्ह्यातील अनेक महिला व ग्राहकांची इंटरनेट द्वारे होणारी लूट रोखण्यासाठी सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी सायबर

हितेन नाईक  लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्ह्यातील अनेक महिला व ग्राहकांची इंटरनेट द्वारे होणारी लूट रोखण्यासाठी सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी सायबर गुन्ह्याच्या जागरूकतेविषयी बनवलेल्या चित्रफितींचे उदघाटन मुख्यमंत्र्यांनी केले व त्याचे कौतुकही केले.मोबाईल द्वारे इंटरनेट आणि सोशल मीडिया चा वापर करून फसवणुक करण्याच्या प्रकरणात सतत वाढ होत असून सन २०१५ मध्ये ३२ गुन्हे तर सन २०१६ मध्ये ४९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे.ह्या गुन्ह्याच्या प्रकारांना आळा घालण्याबरोबरच लोकांमध्ये जनजागृती करण्याचे आव्हान पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उभे राहिले होते. पोलीस उपनिरीक्षक कदम ह्यांनी लिहिलेल्या सायबर गुन्हे व जागरूकता ह्या पुस्तकाची अनेकस्तरावरून प्रशंसा झालेली आहे. जिल्ह्यातील विविध शाळा, कॉलेजेस मध्ये जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण टिप्स दिल्या होत्या.सध्या एटीएम द्वारे होणाऱ्या फसवणुकीचे वाढते प्रमाण पाहून एटीएम कार्ड फसवणूक आणि इंटरनेट वरून महिलांची फसवणूक या दोन चित्रिफती त्यांनी बनविल्या आहेत. ह्या चित्रफितीमध्ये त्यांनी मोबाईल द्वारे एटीएमची माहिती घेऊन ग्राहकांची केली जाणारी फसवणूक व त्याबाबत ग्राहकांनी घ्यावयाची खबरदारी याचे चित्रीकरण केले असून दुसऱ्या चित्रफितीत मोबाईल द्वारे कॉल करून परदेशातील मी श्रीमंत व्यक्ती आहे असे सांगून एक तरु ण अनेक तरुणीशी मैत्री करून परदेशातून गिफ्ट पाठविल्याचा बहाणा करून त्यासाठी लागणारे शुल्क तरु णींना कसे भरायला लावतो. तरुणींची फसवणूक करतो व ते कसे टाळता येते याचे चित्रीकरण आहे. यासाठी सोमनाथ कदम याना जिल्हा पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांचे सहकार्य लाभले असून तलासरी येथील आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कदम ह्यांचे कौतुकहि केले. विशेष पोलीस महानिरीक्षकाच्या हस्ते अनेक पदके व सन्मानचिन्हे हि प्राप्त झाली आहेत.