शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

कापुरबावडी ते ढोकाळीकडे जाणारा कट अखेर खुला; शिंदे सेना, भाजपमध्ये श्रेयासाठी चढाओढ

By अजित मांडके | Updated: April 24, 2024 17:48 IST

आम्ही वचनपूर्ती केल्याचा गवगवा दोनही पक्षांकडून सुरु झाला आहे

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: लोकसभा निवडणुकीच्या धामधुम सुरु असतांनाच कापुरबावडीपासून ढोकाळी, कोलशेतकडे जाणारा वाहतुकीचा बंद असलेला मार्ग अखेर बुधवारी दुपारी जेसीबीच्या सहाय्याने तोडून खुला करण्यात आला. त्यामुळे आता ढोकाळीकडे जाण्यासाठी मारावा लागणारा वळसा कमी होऊन येथील वाहतुक कोंडी देखील सुटणार आहे. परंतु याचे श्रेय आता शिंदे सेना आणि भाजपकडून घेण्यासाठी चढाओढ सुरु झाली आहे. वास्तविक पाहता, वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी येथील पुलाखालील हा मार्ग बंद करण्यात आला होता. परंतु वाहतुक कोंडी काही फुटली नाही, मात्र आता आम्ही वचनपुर्ती केल्याचा गवगवा मात्र या दोनही पक्षांकडून सुरु झाला आहे.

दीड वर्षापूर्वी ठाणे शहरात होणाºया वाहतुक कोंडीवर उपाय करण्यासाठी सुमीत बाबाने मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार शहरातील अनेक भागात डिव्हाडर टाकण्यात आले. कुठे मार्ग बंद करण्यात आला, तर कुठे लोखंडी रॉड टाकण्यात आले. परंतु त्यातील काहीच पर्याय हे वाहतुक कोंडी सोडवू शकले. मात्र काही पर्याय हे वाहतुक कोंडीत आणखी भर घालणारेच ठरल्याचे अधोरेखीत झाले होते. त्यातील वाहतुक कोंडी सोडविण्याचा पर्याय कापुरबावडी नाक्यापासून पुढे गेल्यावर पुलाखालून ढोकाळीकडे जाणाºया मार्गावर करण्यात आला होता. येथील पुलाखालील मार्ग ढोकाळीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे वाहनांना थेट माजिवडा - मानपाडा प्रभाग समितीवरुन हायलॅन्ड मार्गे जावे लागत होते. परंतु त्यामुळे ढोकाळी नाक्यावर वाहनांची संख्या वाढून त्याठिकाणी सांयकाळ पासून वाहतुक कोंडीत आणखी भर पडल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे हा पर्याय चुकीचा ठरत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतरही पुलाखालील मार्ग काही सुरु केला जात नव्हता.

मध्यंतरी भाजपचे ठाणे शहर आमदार संजय केळकर आणि शिंदे सेनेचे माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी हा कट खुला करण्यासाठी प्रयत्न केला होता. असा दावा आता दोघांकडूनही केला गेला आहे. दरम्यान बुधवारी दुपारी १२ वाजता जेसीबीच्या सहाय्याने येथील कट खुला करण्यात आला. यावेळी शिंदे सेनेच्या पदाधिकारी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी याठिकाणी शक्तीप्रदर्शन करीत श्रेय घेण्याचा प्रयत्न दोघांकडूनही करण्यात आला.

मागील एक वर्षापासून आम्ही येथील कट खुला व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते वाहतुक पोलिसांकडे पाठपुरावा करीत होतो. त्यानंतर दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हा कट खुला करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा कट खुला करण्यात आला आहे. परंतु या कामाचे श्रेय भाजपच्या आमदारांनी घेऊ नये, मागील १० वर्षात त्यांनी काय काम केले हे आधी सांगावे मग श्रेय घ्यावे.-संजय भोईर, माजी स्थायी समिती, सभापती, ठामपा - शिंदे सेना

आम्ही हा कट खुला करण्यासाठी जे काही केले, त्याचे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. त्यामुळे, आम्ही काय केले हे कुणी सांगू नये. हा कुट खुला करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला होता. येथील सोसायटीधारकांनी देखील आमच्याकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु दप्तर दिरंगाईमुळे लोकांना याचा त्रास सहन करावा लागला. अखेर हा कट खुला झाला असल्याने पाठपुराव्याला यश आले असेच म्हणावे लागणार आहे.-संजय केळकर, आमदार, भाजप, ठाणे शहर

टॅग्स :thaneठाणे