शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

मारहाण झालेल्या ‘त्या’ तरुणावर गुन्हा

By admin | Updated: June 22, 2017 00:02 IST

सुट्या पैशांच्या वादातून गोवंडी येथील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला मारहाण करणाऱ्या रिक्षा चालकांना मंगळवारी रात्री

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सुट्या पैशांच्या वादातून गोवंडी येथील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला मारहाण करणाऱ्या रिक्षा चालकांना मंगळवारी रात्री अटक केल्यानंतर, अनावश्यक मागण्या करून पोलीस कारवाईत अडथळा आणणाऱ्या सॉफ्टेवअर इंजिनिअरसह त्याच्या बहिणीविरूद्ध नौपाडा पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.मुंबईतील गोवंडी येथील तुषार म्हात्रे याला गावदेवी मैदान परिसरात काही रिक्षा चालकांनी सुट्या पैशाच्या वादातून मंगळवारी रात्री जबर मारहाण केली. पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी, नौपाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, पोलीस निरीक्षक संजय धुमाळ आदींनी तातडीने कारवाई करून तीन रिक्षा चालकांना अटक केली. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलाश पाटील, अरूण लोखंडे आणि मोहम्मद सलीम शेख ही आरोपी रिक्षा चालकांची नावे आहेत. गावदेवी मैदान परिसरातून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतरही तुषार म्हात्रे आणि त्यांची बहिण दर्शना गाणार यांचे समाधान झाले नाही. त्यांनी पोलिसांची गाडी अडवली. आरोपींना पोलीस ठाण्यापर्यंत पायी नेण्याची मागणी करून, पोलिसांच्या वाहनाला लाथ मारली. पोलिसांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्या मागणीवर कायम राहून ते पोलिसांच्या वाहनासमोर झोपले. लोकांना जमवून गोंधळ घालणाऱ्या या भाऊ-बहिणीविरूद्ध नौपाडा पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. तुषार म्हात्रे आणि दर्शना गाणार यांच्यासह आणखी १0 ते १२ अज्ञात आरोपींचा यात समावेश आहे.