शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

माफी व्हिडीओमुळे भिवंडीत सात जणांवर गुन्हा

By admin | Updated: March 19, 2017 05:39 IST

आपल्या होणाऱ्या पत्नीला भररस्त्यात मागणी घालणाऱ्या, वाहतूक रोखून धरत तिला फूल देणाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने समाजाची बदनामी झाल्याचे सांगत

भिवंडी : आपल्या होणाऱ्या पत्नीला भररस्त्यात मागणी घालणाऱ्या, वाहतूक रोखून धरत तिला फूल देणाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने समाजाची बदनामी झाल्याचे सांगत त्या दोघांचे अपहरण करणाऱ्या, त्यांना जबरदस्तीने माफी मागायला लावणाऱ्या आणि त्याचा नव्याने व्हिडीओ तयार करणाऱ्या सात जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अहमद रईस मोमीन याचा साखरपुडा सुमाना मोमीनशी होणार होता. त्याच दिवशी दुपारी ती शाळेतून घरी परतत असताना अहमदने तिला भररस्त्यात मागणी घातली. तिला गुलाबाचे फूल दिले आणि तिने होकार देईपर्यंत वाहतूक रोखून धरण्याचा स्टेट केला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे त्यांच्या नातलगांनी धोबीतलाव येथे होणारा साखरपुडा रद्द करून तो नाशिक रोडवरील हॉटेलमध्ये केला. तरीही काही लोक अहमदला घडल्या प्रकाराबद्दल धमक्या देत होते. त्यानंतर दिवसानी १३ मार्चला अहमदच्या घरी तन्वीर शेख आणि अशहद मोमीन गेले. घरच्यांशी त्यांची चर्चा सुरू असताना असता तय्यब मोहम्मद ईस्माईल, मोहम्मद अरफात, सोशल वर्कर मलीकचा मुलगा अझहर आणि त्यांचे चार साथीदार तेथे आले. त्यांनी अहमदविषयी विचारणा केली. तो घरात नसल्याने त्या सातजणांनी शिवीगाळ आणि मारहाण केली. नंतर त्याला आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून नाशिक रोडवरील कशीश हॉटेलमध्ये नेले. तेथे एका खोलीत कोंडून त्यांना मुस्लिम समाजाची माफी मागण्यास भाग पाडले. त्याचे व्हिडीओ शुटींग केले. संपूर्ण समाजाची माफी मागितल्याशिवाय तुला सोडणार नाही, अशी धमकी तय्यब याने दिली. नंतर या घटनेची व्हिडीओ क्लिप व्हायरल केली. तसेच हातपाय तोडण्याची धमकी देत दोघांना साडेपाच वाजेपर्यंत तेथेच जबरदस्तीने डांबून ठेवले. त्यांचा तपास लागत नसल्याने आणि नातेवाईकांकडून विचारणा होऊ लागल्याने तन्वीर शेखने शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली. (प्रतिनिधी)अद्याप अटक नाही : तय्यब ईस्माईल, मोहम्मद आरफात, मलीकचा मुलगा, सोबतच्या चार जणांविरोधात तक्रार येऊनही पोलिसांनी कारवाई केली नव्हती. मात्र टीकेची झोड उठल्याने अपहरण, मारहाण आणि कोंडून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. मात्र कोणालाही अटक केलेली नाही.