शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांनी बनवले चिमण्यांसाठी घरकुल!

By admin | Updated: March 20, 2017 02:06 IST

येथील संकल्प इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्यांनी चिमण्यांसाठी शेकडो घरकुले तयार करून त्यांना निवारा दिला आहे. जुन्या वह्या-खोक्यांच्या पुठ्ठ्यांचा वापर करत

ठाणे : येथील संकल्प इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्यांनी चिमण्यांसाठी शेकडो घरकुले तयार करून त्यांना निवारा दिला आहे. जुन्या वह्या-खोक्यांच्या पुठ्ठ्यांचा वापर करत विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने ही घरटी बांधली.संकल्प इंग्लिश स्कूल या शाळेत २० मार्च हा जागतिक चिमणी दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जात आहे. या शाळेत लाकडी खोक्यांपासून बनवलेली छोटीछोटी घरटी तसेच प्लास्टिक बाटल्यांपासून तयार केलेले फिडर शाळेच्या आवारात लावले आहे. या घरट्यांमधून चिमण्या आपली पिले जन्माला घालत आहेत. शाळेच्या आवारात चिमण्यांच्या खाण्याची (दाण्याची) व पाण्याची सोयही केलेली आहे. त्यामुळे हरवलेल्या चिमण्यांची चिवचिव या शाळेच्या आवारात ऐकायला मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीने या गोष्टी रोजच्या रोज करण्याकडे शाळेचा कल असतो. विशेष म्हणजे विद्यार्थीदेखील मोठ्या आवडीने हे काम करतात. जागतिक चिमणी दिनानिमित्त ‘संकल्प’ने चिमण्यांसाठी शेकडो घरटी (स्पॅरो हाउस) बनवण्याचे ठरवले. टाकाऊतून टिकाऊ या सदराखाली जाड पुठ्ठ्यांपासून घरटी बनवण्याची मोहीम हाती घेतली. ती घरटी प्रत्येक विद्यार्थ्याला वाटण्यात आली. विद्यार्थी ती घरटी आपापल्या घरी योग्य ठिकाणी लावणार आहेत. शेकडो विद्यार्थ्यांपैकी १० विद्यार्थ्यांनी जरी चिमणीने घरटे बांधले, तरी शाळेला फार मोठे यश मिळेल, असा विश्वास शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती परब यांनी व्यक्त केला.प्राणी वाचवा, निसर्ग वाचवा, या दृष्टीने ‘चिमणी बचाव’साठी हा वेगळा उपक्रम करण्याचे ठरवल्याचे संस्थापक राज परब यांनी सांगितले. घरटी बनवण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबर कलाशिक्षक रुची पारकर, प्रणाली गिरी, श्रद्धा धेंडे, शीतल जाधव, यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)