शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी पाड्यांवर जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण; भिवंडीच्या दाम्पत्याचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 02:11 IST

स्वातंत्र्याचा संबंध केवळ स्वत:च्या अधिकारांशी जोडणाऱ्या समाजाला या दाम्पत्याची सेवावृत्ती निश्चितच प्रेरणादायी आहे.

- नितीन पंडितभिवंडी : कोरोनामुळे शहरात आॅनलाइन शिक्षण सुरू झाले असले, तरी ग्रामीण भागात अशा शिक्षणात अडथळे येत आहेत. त्यात आदिवासी विद्यार्थी तर या आॅनलाइन शिक्षणापासून कोसो दूर आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान पाहता, भिवंडीतील एक दाम्पत्य आपली नोकरी सांभाळून एप्रिलपासून या विद्यार्थ्यांना पाड्यांवर जाऊन शिकवण्याचे काम करत आहे. स्वातंत्र्याचा संबंध केवळ स्वत:च्या अधिकारांशी जोडणाऱ्या समाजाला या दाम्पत्याची सेवावृत्ती निश्चितच प्रेरणादायी आहे.श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते व वकिलीचे शिक्षण घेत असलेले रूपेश सोनावणे व त्यांची पत्नी रेश्मा पालिकेत सफाई कामगार म्हणून काम करते. एका बाजूला कोविडयोद्धा म्हणून काम करत असताना हे दाम्पत्य दुसरीकडे सामाजिक बांधीलकी जपत आहे. भरे गावात राहणारे रूपेश हे वकिलीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहेत. रेश्मा यांना सुरुवातीपासूनच शिकविण्याची आवड असल्याने त्यांनी आपले डीएडपर्यंत शिक्षणही पूर्ण केले. मात्र, कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी शिक्षिका बनण्याचे स्वप्न बाजूला ठेवत सफाई कामगार म्हणून काम सुरू केले.कोरोनाच्या काळात आदिवासी मुलांना शिकवून त्यांनी आपला शिक्षकी पेशाही सुरू ठेवला आहे. सकाळी सफाई कामगार म्हणून नोकरी, तर दुपारपासून संध्याकाळपर्यंत आदिवासी मुलांना हे दोघे शिकवतात. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणात अनेक अडचणी येतात. त्यातच कोरोनामुळे सुरू झालेले आॅनलाइन शिक्षण या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने त्यांना शिकवून मनाला समाधान मिळते, अशी प्रतिक्रि या या दोघांनी दिली.धड्यांबरोबरच विद्यार्थ्यांना कविता, शारीरिक शिक्षण, वैयक्तिक स्वच्छता, मास्क वापरणे, कवायत असे प्रकारही शिकविले जातात. मुलांवरील शिक्षणाचा ताण कमी करण्यासाठी गाण्यांवर नाचायलाही सांगितले जाते. यामुळे शाळेत येण्याची विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण झाली.४० ते ५० विद्यार्थी घेतात शिक्षण : सुरु वातीला १५ ते २० विद्यार्थी शिकण्यासाठी यायचे. मात्र, मुलांना शिकविण्याची पद्धत आवडल्याने सध्या ४० ते ५० विद्यार्थी येत आहेत. आदिवासीपाड्यावरील मुलांना आॅनलाइन शिक्षणाबद्दल काहीच ज्ञान नाही. त्यांच्याकडे मोबाइल नाही. अनेकांच्या घरांत टीव्हीही नाही. शिवाय, गावात इंटरनेट नेटवर्क नसल्याने आॅनलाइन शिक्षण घ्यायचे कसे, असा प्रश्न मुलांना पडला आहे. सोनावणे दाम्पत्याने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा रखडलेला अभ्यास पूर्ण केला आहे.