शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी गटार योजनेचा खर्च ४० कोटींनी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:25 IST

प्रस्ताव महासभेच्या मंजुरीसाठी : भाजप नगरसेविकेचा विरोध

ठाणे : घोडबंदर परिसरात शहरीकरणाचा वेग जास्त असला तरी, या पट्ट्यात राबवण्यात येत असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामाचा वेग मात्र मंदावलेलाच आहे. भुयारी गटार योजनेच्या टप्पा क्र मांक ४ अंतर्गत हे काम येत असून मार्च २०२० पर्यंत ते पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, आतापर्यंत केवळ ४५ टक्केच काम झाले असल्याचा दावा करून आता ते डिसेंबर २०२० किंवा मार्च २०२१ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे विलंबामुळे त्याचा खर्चही ४० कोटींनी वाढल्याने तसा प्रस्ताव महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.

केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत या भुयारी गटार योजनेचा तब्बल १७९.१ कोटींचा जम्बो आराखडा तयार केला आहे. पूर्वी जेएनएनयूआरएमअंतर्गत महापालिका क्षेत्रात भुयारी गटार योजना टप्पा १, २ व ३ अंतर्गत मलनि:सारण योजना राबविण्यात येत असून महापालिका हद्दीतील सुमारे ७१ टक्के भागांत ती कार्यान्वित करण्यात येत आहे.टप्पा क्र मांक ४ मध्ये मानपाडा, ब्रह्मांड, हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा, वाघबीळ, विजयनगरी, आनंदनगर, भार्इंदरपाडा, ओवळा, कासारवडवली, नागलाबंदर, गायमुख, पानखंडा, टकारडापाडा, सुकुरपाडा अशा परिसराचा समावेश आहे. यात नऊ लाख ७९ हजार ७११ एवढी लोकसंख्या गृहीत धरली आहे. या कामांतर्गत पंपहाउस बांधणे, एसटीपी प्लान्ट उभारणे, पाइपलाइन टाकण्यासह इतर कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये केंद्राकडून ५९. ६६९ कोटी, राज्य शासनाकडून २९.८ कोटी आणि महापालिकेकडून ८९.५०५ कोटी असा खर्च केला जाणार आहे.अधिकाऱ्यांची खेळी असल्याचा आरोपवाढीव खर्चाच्या मंजुरीला भाजपाच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनी मात्र विरोध दर्शवला आहे. अधिकारी पालिकेच्या निधीचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला असून दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी यासंदर्भात प्रशासनाकडे पत्राद्वारे माहिती मागवली होती. यामध्ये दिलेल्या मुदतीमध्ये काम केले नाही, तर संबंधित ठेकेदारावर काय कारवाई करणार, असे विचारले होते. यावर प्रशासनाने वेळेत प्रकल्प पूर्ण नाही केला तर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच वाढीव खर्च देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट उत्तर दिले असल्याने या प्रकल्पावर आता संशय निर्माण झाला आहे.प्रकल्प आखताना या तांत्रिक गोष्टी प्रशासनाच्या लक्षात आल्या नाहीत का ? असा प्रश्न उपस्थित करून या वाढीव खर्चाच्या प्रस्तावाला मणेरा यांनी आपला विरोध दर्शवून प्रशासनाच्या तांत्रिक क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने महासभेच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे .