शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचारी मंत्री व ठाकरे सरकारला उघडे पाडणार - किरीट सोमय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:43 IST

भिवंडी : भ्रष्टाचारी मंत्री आणि ठाकरे सरकारला उघडे पाडणारच. फडतूस नाेटिसांना मी भीक घालत नाही, असा निर्धार भाजपचे माजी ...

भिवंडी : भ्रष्टाचारी मंत्री आणि ठाकरे सरकारला उघडे पाडणारच. फडतूस नाेटिसांना मी भीक घालत नाही, असा निर्धार भाजपचे माजी खासदार किरीट साेमय्या यांनी व्यक्त केला. गुरुवारी सायंकाळी त्यांनी भिवंडीतील धामणकर नाका मित्रमंडळाच्या सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मंडळाचे अध्यक्ष संतोष शेट्टी, पदाधिकारी मोहन बल्लेवार, विजय गुज्जा, दिलीप पोद्दार, हसमुख पटेल आदी यावेळी उपस्थित होते. राज्यातील साडेबारा काेटी जनतेची फसवणूक झाली आहे. आतापर्यंत २१ मंत्री आणि नेत्यांचे घाेटाळे उघड केले आहेत. माजी गृहमंत्री फरार आहेत. पाेलीस आयुक्ताचा पत्ता नाही. ज्यातील मंत्री अनिल परब यांचे रिसाॅर्ट, हाॅटेल ताेडून दाखवणार आहे. १८ महिन्यांत राज्यभरात २४ दुर्घटना घडल्या आहेत. भ्रष्टाचार, काेराेनामुळे जनता त्रस्त आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आणि भ्रष्टाचारी सरकारला ठिकाणावर आणण्यासाठी शक्ती दे, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी गणरायाच्या चरणी केली. यावेळी मंडळाच्यावतीने काेराेनाकाळात सेवाकार्य करणाऱ्या बीएनएन महाविद्यालय व ओसवाल महाविद्यालयाच्या एनसीसी व एनएसएस कॅडेट विद्यार्थ्यांचा गौरव सोमय्या यांच्या हस्ते करण्यात आला.