शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविकेला मारहाण

By admin | Updated: May 29, 2017 06:18 IST

मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला, तरी तिकिटासाठी जोरदार रस्सीखेच सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला, तरी तिकिटासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान भाजपा नगरसेविकेसह तिच्या मुलाला भाजपाच्याच पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना भार्इंदर पश्चिमेस घडली. भार्इंदर पोलीस ठाण्यात परस्पर फिर्यादीवरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. भार्इंदर पश्चिमेस नव्या प्रभाग ७ मधील अण्णानगरमधील समाज मंदिराच्या नूतनीकरणाचे काम आ. नरेंद्र मेहता यांच्या निधीतून मंजूर झाले. त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रविवारी होता. स्थानिक नगरसेविका प्रतिभा तांगडे-पाटील यांच्यासह या प्रभागातून भाजपाचे इच्छुक नगरसेवक अ‍ॅड. रवी व्यास आदी उपस्थित होते. मेहता आल्यावर भाजपाचे काही कार्यकर्ते व रहिवाशांनी मेहतांकडे येऊन स्थानिक नगरसेविकेने कामेच केलेली नाहीत. त्या येथे फिरकल्याही नाहीत, असा तक्रारींचा सूर लावला. त्यावर आपण प्रभागात कामे केली असून स्थानिकांसोबत छायाचित्रेही आहेत, असे तांगडे-पाटील म्हणाल्या. दरम्यान, तुमची कामे असतील तर मला सांगा, असे नागरिकांना सांगून कार्यक्रम आटोपता घेत मेहता निघून गेले. नगरसेविका प्रतिभा, मुलगा शुभम हे थांबले होते. शुभमने भाजपा युवा मोर्चाचा पदाधिकारी वासुदेव हरिजन (२७) याला आईने काम करूनही तू असे का बोलला, अशी विचारणा केली असता वाद झाला. ते पाहून वासुदेवचे अन्य सहकाऱ्यांनी धावून येत शुभमला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात नगरसेविका पाटील यांनाही धक्काबुक्की झाली. पक्षांतर्गत चाललेला राडा पाहून अ‍ॅड. व्यास व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेत शुभमला सोडवले.प्रतिभा पाटील पुन्हा इच्छुकरोहिणी कदम, दीपाली मोकाशी, माजी नगरसेविका सुधा व्यास, निर्मला माखिजा, रितू कोळी इच्छुक आहेत. पाटील या स्थानिक नगरसेविका असून त्याही इच्छुक आहेत. महिलांचे दोन्ही प्रभाग खुल्या प्रवर्गातील असल्याने त्या राहत असलेल्या प्रभाग ८ मधून उमेदवारी देण्याची स्थानिक नेतृत्वाची तयारी आहे. तसेच या प्रभागातून नगरसेवक मॉरस रॉड्रिक्स व रवी व्यास यांची भाजपाकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे.