शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: ठाण्यात जूनच्या २४ दिवसांत आढळले तीन हजार ९२६ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 01:01 IST

असले तरी शहरात कोरोनाचे आता नवे हॉटस्पॉट तयार झाले असून घोडबंदर, वर्तकनगर, नौपाडा कोपरी, उथळसर येथे कोरोनाच्या रुग्णात कमालीची वाढ झाली आहे.

ठाणे : ठाण्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचे अवघे ३१० रुग्ण होते. मे महिन्यात ही संख्या २९०१ एवढी झाली. तर आतापर्यंत म्हणजेच २४ जूनअखेर शहरात ६८२७ कोरोना रुग्ण झाले आहे. परंतु, एप्रिल आणि मेच्या तुलनेत जूनच्या अवघ्या २४ दिवसांत शहरात नवे ३९२६ रुग्ण आढळले असून १५० नागरिकांचा मृत्यू झाला असून याच कालावधीत २२६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. असले तरी शहरात कोरोनाचे आता नवे हॉटस्पॉट तयार झाले असून घोडबंदर, वर्तकनगर, नौपाडा कोपरी, उथळसर येथे कोरोनाच्या रुग्णात कमालीची वाढ झाली आहे. शिवाय सोसायट्यांमध्ये आता रुग्ण आढळत आहेत.शहरात घोडबंदर अर्थात माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत बाधीतांची संख्या वाढतांना दिसत आहे. या येथे झोपडपट्ट्यांबरोबरच सोसायटींमध्येही आता कोरोनाने जोरदार शिरकाव केला आहे. मानपाडा गावात रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथील प्रवेशद्वारच लॉक करून कोणालाही बाहेर अथवा बाहेरच्याला आत प्रवेश नाकारला असला तरी चोरी चुपके येथे ये जा सुरूआहे. दुसरीकडे येथील उच्चभ्रू सोसायटींमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. या पट्ट्यात आता दिवसाला २५ ते ३० नवे रुग्ण आढळत आहेत. हीच परिस्थिती वर्तकनगर, उथळसर, नौपाडा आणि कोपरीतही आहे. याठिकाणीदेखील कोरोनाची साखळी तयार होत असून दिवसाला २० ते ३० नवे रुग्ण आढळत आहेत.एकीकडे लोकमान्यनगर, वागळे इस्टेट या हॉटस्पॉटमधील रुग्णांची संख्या आता आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. परंतु, दुसरीकडे नवे हॉटस्पॉट तयार होत असल्याने महापालिकेच्या चितेंत वाढ होऊ लागली आहे.>रुग्ण दुप्पट होण्याचाशहरात वेग वाढलाशहरातील रुग्ण दुपटीचा वेग आणि कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. एप्रिल महिन्यात अवघे ३१० कोरोनाचे रुग्ण होते. तर, ११ जणांचा मृत्यू झाला होता. ५४ नागरिकांनी कोरोनावर मात केली होती. तर मे महिन्यात रुग्णांची संख्या २९०१ एवढी होऊन ७३ जणांचा मृत्यू झाला. तर ११८३ जणांनी कोरोनावर मात केली.