शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: लॉकडाऊनकाळात अत्यावश्यक सेवेसाठीच धावणार टीएमटी बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 01:12 IST

प्रवाशांची संख्या कमी करण्याचा निर्णय : उभ्याने प्रवास करण्यास मनाई, १७ बस पुन्हा रुग्णांच्या सेवेत दाखल

ठाणे : राज्यात आता पुन्हा मिनी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार ठाणे परिवहन सेवेनेदेखील परिपत्रक काढण्याचे निश्चित करून टीएमटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या घटवण्याचा निर्णय घेतला. तसेच लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी बस रस्त्यावर उतरविल्या जाणार असून त्याचे प्रमाण ५० टक्क्यांच्या आसपास असणार आहे.टीएमटीच्या बसना सकाळ आणि सायंकाळी प्रवाशांची गर्दी होते. परंतु,  आता मिनी लॉकडाऊनमुळे परिवहन सेवेने प्रवाशांच्या प्रवासावरदेखील बंधने आणण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांना उभ्याने प्रवास करता येणार नसल्याचे परिवहनने स्पष्ट केले आहे. यासाठी परिवहनच्या स्टेशन भागातून सुटणाऱ्या बसमध्ये जेवढ्या सीट असतील तेवढेच प्रवासी बसविले जाणार आहेत. यामुळे पुढील थांब्यावर थांबलेल्या प्रवाशांनी करायचे काय असा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित होणार आहे. यापूर्वीही परिवहन प्रशासनाने अशा प्रकारची बंधने घालण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, प्रवाशांकडून त्याचे पालन होतांना दिसत नसल्याचे परिवहनचे म्हणणे आहे. त्यामुळे आतातरी याचे पालन होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.लॉकडाऊनच्या कालावधीत टीएमटीची सेवा केवळ अत्यावश्यक सेवेसाठी रस्त्यावर उतरविली जाणार आहे. तसेच १७ बस या ॲम्ब्युलन्स म्हणून पालिकेला पुन्हा दिल्याचेही परिवहनकडून सांगण्यात आले.