शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: लसीकरणाच्या ठिकाणीच आरटीओचे शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 00:56 IST

कोरोना नियम पायदळी : सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

मुरबाड : कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा ही विविध उपाययोजना करत असताना, मुरबाडमधील शासकीय विश्रामगृहात कोरोनाचे लसीकरण सुरू असून, त्याच ठिकाणी कल्याण प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा कॅम्प असल्याने लसीकरण की आरटीओचे कामकाज सुरू आहे हेच कळेनासे झाले आहे. गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. अशामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.तालुक्याचा बहुतांश भाग हा ग्रामीण असल्याने कोविडचे प्रमाणही कमी आढळते. भविष्यात कोविडचे सावट येऊ नये म्हणून नागरिक कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घेण्यास स्वत:हून पुढे येत आहेत. परंतु कोरोनाचे प्रमाण हे शहरी भागात मोठ्या प्रमाणात असल्याने कल्याण- डोंबिवली, ठाणे, मुंबई येथील एखादा प्रवासी आपल्याशेजारी आला, तरी नागरिकांमध्ये घबराट होते. त्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक हे सुरक्षितता बाळगतात.कल्याणमध्ये कोरोनाचे रुग्ण अधिक आढळूनही तेथील प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी हे शहरी भागात कॅम्प आयोजित करण्यासाठी स्थानिक यंत्रणेकडून परवानगी मिळत नसल्यामुळे ते आपला आर्थिक फायदा होण्यासाठी मुरबाडसारख्या ग्रामीण भागात आपले कॅम्प आयोजित करून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे.इतर नागरिकांना प्रतिबंधमुरबाड येथील शिवनेरी विश्रामगृहात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असून, त्या ठिकाणी इतर नागरिकांना प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याठिकाणी कोणतेही शिबिर किंवा इतर कार्यक्रम घेऊ नये, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या असतानाही ते या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करीत आहेत.    - डॉ. श्रीधर बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी