शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कल्याण-डोंबिवलीतील खासगी रुग्णालयांकडे रुग्णांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 01:20 IST

खासगी कोविड रुग्णालयात २११ बेड रिक्त, रुग्णांच्या नातलगांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला

- मुरलीधर भवारकल्याण : कोरोनाच्या पहिल्या लाटेत खासगी रुग्णालयांनी केलेल्या लुटमारीच्या सुरस व चमत्कारिक कथा सर्वश्रुत असल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांचा खासगी रुग्णालयांची पायरी न चढण्याकडे कल आहे. कल्याण-डोंबिवली शहरांत दररोज नवे हजारेक रुग्ण आढळत असून बहुतांश रुग्णांना केडीएमसीच्या कोविड रुग्णालयात उपचार घ्यायचे असल्याने तेथे रुग्णांची तुफान गर्दी झाली आहे तर खासगी कोविड रुग्णालयात २११ बेड चक्क रिक्त आहेत. केडीएमसीच्या रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांच्या नातलगांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत असतानाही रुग्ण खासगी रुग्णालयांत दाखल होण्यास तयार नाहीत.केडीएमसी हद्दीत काही खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांनी बेडची चौकशी केली असता त्यांना बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. मंत्रालयात कार्यरत असलेले आणि कल्याणमध्ये राहणारे कर्मचारी व त्यांच्या पत्नीलाही कोरोना झाला आहे. त्यांनी बेडची विचारणा केली असता त्यांना खासगी रुग्णालयात दुपारपर्यंत बेड उपलब्ध झालेला नव्हता. त्यांनी महापालिकेच्या आरोग्य खात्याशी संपर्क साधला असता आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांनी होलिक्रॉस, आयुष आणि अन्य एका खासगी रुग्णालयात चौकशी केली असता त्याठिकाणी बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी अन्य काही खासगी रुग्णालयांत २११ बेड शिल्लक आहेत. खासगी रुग्णालयात बेड शिल्लक असताना रुग्णांचा सरकारी कोविड रुग्णालयात प्रवेश मिळावा याकडे अधिक कल दिसून येतो. कारण सरकारी रुग्णालयात उपचार मोफत मिळतात तर खासगी रुग्णालये बिलाकरिता मानेवर सुरा फिरवतात, असे रुग्णांच्या नातलगांचे म्हणणे आहे. भीती मनातून काढून टाकाखासगी रुग्णालयांनी रुग्णांची लूट करू नये याकरिता मनपाने पुन्हा खासगी रुग्णालयात ऑडिटर्सची नियुक्त्या केली आहे. सरकारी नियमानुसार बिल आकारले जात आहे की नाही याची दाद मागण्यासाठी हे ऑडिटर्स नेमले असल्याने नागरिकांनी बिलाची भीती मनातून काढून टाकावी, असे आवाहन मनपाने केले.८० टक्के बेड कोविड रुग्णांसाठी आरक्षित महापालिका हद्दीत आजमितीस ४० खासगी रुग्णालयांत कोविड रुग्णांवर उपचार करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. एखाद्या रुग्णालयाने परवानगी मागितल्यास त्याच दिवशी परवानगी दिली जात आहे. खासगी रुग्णालयातील एकूण बेडपैकी ८० टक्के बेड हे कोविड रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आलेले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या