शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

CoronaVirus News: कोरोना बाधितांमध्ये तरुण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 01:11 IST

तरुण पिढीलाच कोरोनाचा अधिक विळखा बसत आहे. त्यामुळे ज्येष्ठांपाठोपाठ आता तरुणांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

ठाणे : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून, ठाण्यातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. परंतु, या लाटेत बाधित होणाऱ्यांमध्ये ज्येष्ठांच्या तुलनेत तरुणांचे प्रमाण अधिक आहे. तरुण पिढीलाच कोरोनाचा अधिक विळखा बसत आहे. त्यामुळे ज्येष्ठांपाठोपाठ आता तरुणांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.ठाण्यात आतापर्यंत ८७ हजार २८९ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यातील ७२ हजार ८९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एक हजार ४१४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या १२ हजार ९८३ एवढी आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी एका दिवसात ५० दिवसांवरून ४३ दिवसांवर आला आहे. ठाणे पालिका हद्दीत सध्या दररोज १,५०० ते १,८०० च्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे त्यांना उपचारासाठी बेड उपलब्ध करून देण्यासाठीदेखील तारेवरची कसरत सुरू आहे. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्येष्ठांच्या तुलनेत तरुणांचे प्रमाण अधिक आहे. त्यात दिवसागणिक ही संख्या आणखी वाढताना दिसत आहे. तरुण मंडळी कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडत असल्याने हे प्रमाण आता वाढताना दिसत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.वयोगट    एकूण रुग्ण० ते १०    ६,८२१११ ते २०    ३०,७१७२१ ते ४०    ३१,३१२४१ ते ६०    १४,८१५६१ ते ८०    १,६९९१०० पुढील    १मार्च २०२१ मधील रुग्णवयोगट    रुग्ण० ते १९     ६८३२० ते ३९    २,९०६४० ते ५९    २,७६५६० ते ७९    १,२४७८० ते ९९    १४१दररोज आढळणाऱ्या रुग्णांमध्ये लहान मुलांचे प्रमाणही  वाढताना दिसत आहे. त्यामुळे लहान मुलांनाही घराबाहेर पाठवू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या