शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown News: मिनी लाॅकडाऊनविरोधात व्यापारी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 00:51 IST

ठाण्यातील नौपाडा परिसरात रस्त्यावर निषेध : निर्बंध शिथिल करण्याची मागणी

ठाणे : राज्य शासनाच्या वतीने केवळ शनिवार आणि रविवार संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश दिले असतानाच सोमवारी अचानक ठाणे महापालिकेने संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केल्याने व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे मंगळवारी शहरातील व्यापाऱ्यांनी तसेच नौपाडा भागातील व्यापाऱ्यांनी याचा निषेध करून रस्त्यावर उतरून आंदोलन केले. तसेच निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली.गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.  अनलॉक नंतर सर्व व्यवहार मूळपदावर येत असतानाच पुन्हा कोरोनाने जोरदार धडक देऊन सर्व व्यवहार ठप्प केले. आमच्या पुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला असून आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नसल्याचे मत ठाण्यातील व्यापाऱ्यांनी मंगळवारी व्यक्त केले. मुख्यमंत्री एक सांगतात आणि स्थानिक प्रशासन वेगळेच करतात याचा अर्थ काय, असा सवालही त्यांनी विचारला आहे. सरकारने आखून दिलेल्या सुरक्षेच्या नियमांचे पालन करायला तयार असताना आमच्यावरच हा अन्याय का, असे त्यांचे म्हणणे आहे. अनेक शहरांमध्ये जसे व्यापारी संघटनांनी विरोधात बंड पुकारले आहे. तसाच विचार सर्व लहान मोठ्या व्यापाऱ्यांच्या डोक्यात घोळत असल्याने येत्या काळात तोडगा निघाला नाही तर कठोर पाऊल उचलू, असा इशाराही व्यापाऱ्यांनी सरकारला दिला आहे. दरम्यान, या संदर्भात आखलेले निर्बंध शिथिल करावेत, किंवा सम-विषमनुसार बाजारपेठ खुली करावी अशी मागणी देखील व्यापाऱ्यांनी केली. किंवा वेळा ठरवून त्यानुसार दुकाने उघडी ठेवण्यास त्यांनी परवानगी मागितली आहे.डोंबिवलीमध्ये व्यापाऱ्यांनी केली मानवी साखळी डोंबिवली : मिनी लॉकडाऊनची अंमलबजावणी करताना प्रशासनाने दुकाने बंद ठेवण्यास सांगितल्याने डोंबिवलीतील व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पूर्वेत आणि पश्चिमेत व्यापाऱ्यांनी मानवी साखळी करून आपला निषेध नोंदवला.पूर्वेतील उर्सेकरवाडी येथील व्यापारी मंगळवारी सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान रस्त्यावर उतरले. तेथे त्यांनी दुकानासमोर मानवी साखळी करून राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे दुकानातील कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शासन बोलते एक आणि करते एक असे सांगून त्यांनी नाराजी दर्शवली. रामनगर पोलीस यावेळी उपस्थित होते. व्यापाऱ्यांनी कोणतीही घोषणाबाजी तसेच नियमांचे उल्लंघन केले नसल्याने कारवाई केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.पश्चिमेतील गुप्ते रोडवरही मंगळवारी व्यापाऱ्यांनी दुकान बंदच्या आदेशाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करून मानवी साखळी आंदोलन केले. सायंकाळी ५ वाजता व्यापारी रस्त्यावर उतरले होते. या निर्णयामुळे आमच्यासह दुकानातील कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.  दरम्यान, आंदोलनाच्या वेळी जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. विशेष बाब म्हणजे आंदोलन सुरू असताना पोलीस घटनास्थळी उपस्थित नव्हते.भिवंडीत रस्त्यावर दाढी करून सलून व्यावसायिकांचा विरोध; लॉकडाऊन लादल्याने राज्य शासनाचा केला निषेध भिवंडी : गेले वर्षभर लॉकडाऊनमुळे सर्व व्यावसायिकांची अर्थव्यवस्था धुळीस मिळाली असताना पुन्हा दुसऱ्या कोरोना लाटेत लॉकडाऊन सदृश परिस्थिती राज्यशासनाने निर्माण केली आहे. त्यामध्ये सलून व्यावसायिकांना मनाई करण्यात आली आहे. त्या निषेधार्थ ते रस्त्यावर उतरून निषेध नोंदवित आहेत. भिवंडीत मंगळवारी राष्ट्रीय नाभिक संघटनेचे अध्यक्ष अरुण जाधव, राष्ट्रीय सरचिटणीस महेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली कोंबडपाडा येथे सलून दुकाने बंद ठेवून दुकानांबाहेर प्रातिनिधिक स्वरूपात नागरिकांची दाढी करून शासनाचा निषेध नोंदवण्यात आला. गेल्या लॉकडाऊनमध्ये २१ सलून व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या. त्यानंतर आता पुन्हा सलून व्यवसायावर उपजीविका करणाऱ्या समाजाला देशोधडीला लावण्याचा प्रकार राज्य शासन करीत आहे. या निर्णयाचा राष्ट्रीय नाभिक संघटनेने निषेध केला आहे. मंगळवारी भिवंडी शहरातील सलून दुकानांबाहेर दंडावर काळ्या फिती लावून रस्त्यावर नागरिकांची दाढी करून निषेध नोंदवण्यात आला. राज्य शासनाने दोन दिवसांत सलूनबाबत निर्णय बदलला नाही तर निदर्शने करण्याचा इशारा राष्ट्रीय सचिव महेंद्र जाधव यांनी दिला. या निषेध आंदोलनात प्रदेश सचिव तुषार भोईर, कोकण विभाग संपर्कप्रमुख भालचंद्र मोरे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आबा बिरारी, कोकण विभाग महिला अध्यक्ष सोनाली चव्हाण यांसह दुकानदार सहभागी झाले होते.