शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown News: शेवटच्या क्षणी दुकानदारांची धावपळ अन् नागरिकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 01:16 IST

निर्बंधांची अंमलबजावणी सुरू : रात्रीपर्यंत ठाणे मार्केट गजबजलेलेच

- स्नेहा पावसकरठाणे : पोलिसांकडून मेगाफोनद्वारे दुकाने बंद करण्यासाठी होणारे आवाहन, तर काही दुकानांत थेट जाऊन केल्या जाणाऱ्या सूचना, त्यातही नागरिकांची उरलेसुरले काही खरेदी करण्यासाठीची धावपळ आणि संचारबंदीमुळे रात्री ८ पूर्वीच घराकडे घाईघाईने निघालेल्या नोकरदारांची रस्त्यावर लगबग, असे चित्र सोमवारी सायंकाळी ७ च्यानंतर ठाण्यातील प्रमुख रस्त्यांवर पाहायला मिळाले. राज्य सरकारने सोमवारी रात्री ८ नंतर कडक निर्बंध लागू करण्याच्या दिलेल्या आदेशानुसार सोमवारी सायंकाळी साधारण ७.३० नंतर ठाणे मार्केट आणि गर्दीच्या परिसरात पोलीस दुकाने, कार्यालये बंद करण्याचे तसेच नागरिकांना विनाकारण न फिरण्याबाबत जाहीर आवाहन करत होते. रस्त्यावरील फेरीवाल्यांनी आधीच आपले बस्तान गुंडाळले होते. तर दुकानदारांची मात्र काहीशी धावपळ झाली. मात्र, काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत होते.कोरोनाची दिवसेंदिवस वाढती रुग्णसंख्या पाहता कधीही लॉकडाऊन होऊ शकेल, या विचाराने सामान्य ठाणेकर सोमवारी सकाळीच अन्नधान्य, किराणा सामान खरेदीसाठी घराबाहेर पडलेले दिसले. तर मार्केट, शॉपिंग प्लाझा या ठिकाणीही मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली.मागच्या वर्षी याच महिन्यात कडक लॉकडाऊन होता. अगदी काही तासांसाठी तिही ठराविक भागातील दुकाने सुरू राहायची. त्यामुळे अन्नधान्य, खाण्याच्या वस्तूही विकत, प्रसंगी जास्त पैसे देऊन तरी मिळतात का, त्यासाठी ठिकठिकाणी फिरायला लागायचे. तिथे जाताना वाटेत पाेलीस अडवणूक करायचे. आणि इतके करूनही हवी असलेली वस्तू मिळायचीच असे नाही. कारण त्यादरम्यान सगळ्याचा तुटवडा होता. शॉपिंग प्लाझामध्ये जायचे म्हटले तर तासन् तास रांगेत उभे राहावे लागायचे. हे कटू अनुभव अनेकांनी घेतलेले आहेत. आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना सरकारने कडक निर्बंध घातले आहेत, तर नागरिकांनी निर्बंधांचे पालन केले नाही तर कारवाई करण्याबरोबरच लॉकडाऊनचे संकेतही यापूर्वीच दिले आहेत. आणि दररोज वाढते रुग्ण पाहता कधीही लॉकडाऊन जाहिर होईल, अशी भीती आणि चर्चा ठाणेकरांमध्ये रविवारपासूनच होती. तर, सोमवारी सायंकाळी पोलिसांनी नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. दुकानांमध्ये खरेदीसाठी सकाळपासूनच रांगासरकार पहिले काही दिवस निर्बंध घालून पाहील आणि मग लॉकडाऊन लावेल, अशी भीती नागरिकांत दिसते आहे. आणि या भीतीमुळेच सोमवारी सकाळी सामान्य ठाणेकर किराणा वस्तू, खाद्यपदार्थ, भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. ठाणे मार्केट परिसर, शहरातील विविध शॉपिंग बाझार येथे सकाळपासून गर्दी झालेली पाहायला मिळाली. साठवण करण्याच्या दृष्टीने ठाणेकर सामान खरेदी करत होते. ‘लॉकडाऊन झाले तर मग कुठे धावपळ करायची, अशी चर्चा त्यांच्यामध्ये ऐकायला मिळत होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या