शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown News: लॉकडाऊन लागू झाल्यास जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 01:55 IST

निर्बंधांवर भर द्यावा : हाॅटेल व्यावसायिक

- जितेंद्र कालेकरठाणे : आधीच सलग सहा ते सात महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. पुन्हा असाच लॉकडाऊन झाल्यास हॉटेल व्यवसाय आणि त्यावर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यापेक्षा कडक निर्बंध व्हावेत, अशी अपेक्षा ठाण्यातील हॉटेल अ‍ॅन्ड रेस्टॉरन्ट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.ठाणे शहर हॉटेल संघटनेचे सदस्य पुष्पराज शेट्टी लॉकडाऊनबाबत आपले मत मांडताना म्हणाले की, सध्या हॉटेल व्यवसाय हे ५० टक्के क्षमतेने सुरू आहेत. रात्री आठनंतर ते बंद केले जातात. त्यामुळे आधीच हॉटेल व्यावसायिकांच्या उत्पन्नावर परिणाम झालेला आहे. सरसकट टाळेबंदीपेक्षा मास्क घातला नाही, सामाजिक अंतराचे आणि स्वच्छतेचे नियम पाळले नाहीत तर अशा लोकांवर जरूर कारवाई केली जावी. कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे २२ मार्च २०२० पासून हॉटेल, उपाहारगृह बंद ठेवले होते. सलग सात महिने ते बंद राहिल्यामुळे हॉटेल व्यवसायाला उतरती कळा लागली होती. अनेक जण कर्जबाजारी झाले. काहींनी आत्महत्या केली. त्यावर अवलंबून असलेल्या अनेक कामगारांचे हाल झाल्याच्या वेदना शेट्टी यांनी व्यक्त केल्या आहेत.ते पुढे म्हणाले, लॉकडाऊनची आवश्यकता आहे की नाही, यावर जाणकार मंडळीच भाष्य करू शकतील. पण लोकांची रोजीरोटी चालू राहिली पाहिजे. कोणाचाही रोजगार न बुडता निर्बंध आणले गेले पाहिजेत. तरीही लॉकडाऊन लादले गेल्यास उत्पन्नाचे साधनच बंद होऊ शकते. त्यामुळे मग जगायचे कसे, असाही यक्ष प्रश्न असल्याचे अन्य एका पदाधिकाऱ्याने सांगितले. यावर अवलंबून असलेले शेकडो कामगार, त्यांचे कुटुंबीय तसेच हॉटेल मालक आणि चालक अशा सर्वांचेच हाल होण्याची भीतीही हे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. नियम कठोर करावेत लॉकडाऊन होऊ नये यासाठी काही अपवाद वगळता हॉटेल व्यावसायिकांकडून नियमांचे पालन केले जात आहे. यासाठी प्रशासनानेही मोठी मोहीम उघडली पाहिजे. त्याला नागरिकांनी प्रतिसाद देणे अपेक्षित आहे. नियम आणखी कडक केले जावेत, असा सल्लाही ठाणे शहर हॉटेल संघटनेचे सदस्य पुष्पराज शेट्टी यांनी दिला आहे.