शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown News: ... तर यंत्रमाग व्यवसायाचे पार कंबरडेच मोडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 02:03 IST

भिवंडीतील व्यावसायिक झाले कर्जबाजारी : हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती

- नितीन पंडित भिवंडी :  कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून यंत्रमाग व्यवसायास घरघर लागली आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये कोरोना आटोक्यात आल्याने व त्यानंतर दसरा, दिवाळीसारखे सण लागोपाठ आल्यामुळे लॉकडाऊनमुळे डबघाईला आलेल्या यंत्रमाग व्यवसायाची गाडी रुळावर यायला लागली होती तोच मार्च महिन्यापासून शहरासह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढले आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता भिवंडी मनपा प्रशासनाने शहरात कडक निर्बंध लागू केले आहेत.लॉकडाऊन केल्यास भिवंडीतील यंत्रमाग व्यवसायाची अक्षरशः दाणादाण उडणार असून व्यवसायाचे पार कंबरडेच मोडून जाईल. मागील वर्षभर लॉकडाऊन काळात यंत्रमाग व्यावसायिकांनी आपल्याकडे असलेल्या जमापुंजीत कामगारांना किमान पोटभर जेवण तरी दिले होते मात्र वर्षभरापासून असलेल्या बंद मुळे आता अनेक यंत्रमाग व्यावसायिक कर्जबाजारी झाले असल्याने बंदच्या काळात कामगारांना जेवण व भत्ता देण्यात असमर्थ ठरणार असल्याने येथील यंत्रमाग कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. यंत्रमाग व्यावसायिकांना आवश्यक असलेल्या यार्नच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे . त्यामुळे व्यावसायिकांना चढ्या भावाने यार्नची खरेदी करावी लागत आहे. प्रती किलो ३५० रुपयाला मिळणारा यार्न सध्या ६७० रुपयांना खरेदी करावा लागत आहे. तसेच वीजबिल व यंत्रमाग कारखान्याचा इतर खर्च या सर्व बाबी यंत्रमाग मालकांना सहन कराव्या लागत आहेत. त्यातच जर आता लॉकडाऊन झाला तर यंत्रमाग व्यावसायिक कर्जबाजारी होतील व कामगारांवरही उपासमारीची वेळ येईल. ज्यामुळे यंत्रमाग व्यवसायाचे कंबरडे मोडण्याची भीती यंत्रमाग व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. व्यावसायिक पाळत आहेत नियमसरकारच्या नियमांचे पालन करण्यास यंत्रमाग व्यावसायिक तयार आहेत. ते नियमही पाळत आहेत, मात्र असे असतानाही जर लॉकडाऊन झालाच तर मात्र यंत्रमाग व्यावसायिक पूर्णतः कर्जबाजारी होईल व यंत्रमाग व्यवसायही त्यामुळे डबघाईला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया यंत्रमाग व्यावसायिक भूषण रोकडे यांनी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या