शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown News: ठाणे शहरात दुसऱ्या दिवशीही शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 01:09 IST

मिनी लॉकडाऊन : व्यापारी, नागरिकांचाही मिळतोय प्रतिसाद

ठाणे : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारच्या वतीने मिनी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यानंतर ठाणे महापालिकेनेदेखील आता शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच सेवा बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पहिल्या दिवशी शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने उघडी करण्यासाठी आंदोलन केले होते. परंतु, बुधवारी संपूर्ण ठाण्यातील अत्यावश्यक सेवावगळता इतर सर्व प्रकारचे व्यवहार बंद असल्याचे दिसून आले. तर इंदिरानगर भागात व्यापाऱ्यांनी हाताला निषेधाच्या काळ्या पट्टय़ा लावून आंदोलन केले.वसेंदिवस वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे ब्रेक द चेन करून राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन घेतला आहे. त्याचा परिणाम पहिल्या दिवशी ठाण्यात दिसून आला नाही. ठाण्यातील व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून याचा निषेध करून आंदोलन केले होते. मात्र, दुसऱ्या दिवसापासून शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना बंद असल्याचे दिसून आले. सर्वच दुकाने उघडण्यासाठी काही ठराविक वेळ मिळेल, या आशेवर व्यापारी असून लवकरच यावर तोडगा निघेल, असा दावा त्यांनी केला आहे. इंदिरानगर येथील व्यापाऱ्यांनी हाताला काळ्या पट्ट्या लावून निषेध आंदोलन केले.टीएमटी किंवा इतर परिवहन सेवांनीही जेवढी आसने असतील तेवढ्या प्रवाशांना प्रवासाची मुभा दिली होती. त्यामुळे इतर स्थानकांवर थांबलेल्या प्रवाशांची मात्र चांगलीच पंचाइत झाली. बसमध्ये एखादी सीट रिकामी असेल तर ती मिळविण्यासाठी बसथांब्यावर जणू स्पर्धाच लागल्याचे चित्र अनेक बसथांब्यावर दिसत होते. गल्लीबोळातून दुकाने मात्र चोरी चोरी चुपके सुरू असल्याचेही चित्र काही ठिकाणी होते.रस्त्यावर फिरणे टाळले शहरातील वाहतुकीची वर्दळही कमी झाली आहे. स्टेशन परिसर, राम मारुती रोड, गोखले रोड, जांभळीनाका येथील मार्केटमधील गर्दी बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचे दिसले. याशिवाय नागरिकांनीदेखील आता या मिनी लॉकडाऊनला समर्थन दिल्याचे दिसत होते. त्यांनीही रस्त्यावर फिरण्याचे टाळल्याचे दिसले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या