शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown News: अनेक इमारतींमध्ये प्रवेश बंद, तरी ग्राहकांना हवे घरपोच पार्सल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 01:00 IST

होम डिलिव्हरी करणारे कर्मचारी चिंतेत: मायक्रो कंटेन्मेंट झोनमुळे बसताेय फटका

- स्नेहा पावसकरठाणे : आता या मिनी लॉकडाऊनमध्ये बाहेर बाजारपेठा, मॉल्स, दुकाने बंद आहेत; परंतु हल्ली सर्रास वस्तू ऑनलाइन घरी मागवल्या जातात. या वस्तू घरी पोहोच करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. वस्तू, पदार्थ घेऊन एखाद्या इमारत, चाळीत जायचे म्हटले, तर ठाण्यात अनेक सोसायट्या, इमारतींमध्ये बाहेरील व्यक्तींना पुन्हा प्रवेश बंद केलेला आहे, काही इमारती तर मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. मात्र, तरीही तेथील ग्राहकांचा आग्रह घरपोच सेवा देण्याचा असतो. बिल्डिंगचे सिक्युरिटीही रहिवाशांचे पार्सल सोडवून घेत नाहीत, अशा परिस्थितीत आम्ही काम करायचे कसे? आमच्या आरोग्याला धोका नाही का? किंवा आमच्यावर काही गुन्हा दाखल झाला, तर त्याला जबाबदार कोण? असे प्रश्न होम डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारने पुन्हा लॉकडाऊन नाही; पण राज्यभर कडक निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना आहेत. मात्र, पार्सल, होम डिलिव्हरी सुरू आहे. गेल्या काही वर्षांत अनेक लहान- मोठ्या वस्तू ऑनलाइन ऑर्डर करणे सुरू आहे. वेळ आणि पैसा दोन्ही वाचत असल्यामुळे आणि सध्या तर काेरोनाचे वातावरण असताना बाहेर जाणे टाळण्यासाठी ऑनलॉइन खरेदीला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. अनेक कंपन्यांचे कर्मचारी होम डिलिव्हरीचे काम करतात. मात्र, सध्या ठाणे आणि परिसरात अनेक इमारतींमध्ये पुन्हा बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंद केलेला आहे. सोसायटीच्या गेटवरच तसे फलक लिहिलेले आहेत. काही सोसायट्यांत रुग्ण सापडल्याने तो परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करून तसे फलक लावलेले दिसत आहेत. आता अशा सोसायट्यांत प्रवेश नसल्याने आणलेले पार्सल ग्राहकापर्यंत पोहोचवायचे कसे, हा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर आहे. ग्राहकाला गेटजवळ बोलावले तरी ते घरी पोहोचवा असेच सांगतात.   लोकांच्या दारात जाणे म्हणजे आजाराला स्वत:हून भेट देण्यासारखे असून जिथे असे कंटेन्मेंट झोन आहे, तेथील रहिवाशांनी तरी  सहकार्य करावे, असे डिलिव्हरी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.आम्ही होम डिलिव्हरीचे काम करतो. मात्र, मायक्रो कंटेन्मेंट झोन असलेल्या परिसरात जाणेही आरोग्यासाठी घातक आहे. इतर ठिकाणी, इतर वेळी आम्ही ग्राहकाच्या दरवाजापर्यंत सेवा देतो. मात्र, आता या परिस्थितीत ग्राहकांनीही समजून घेऊन सहकार्य करावे.    -दिनेश राजुरेआम्ही पार्सल घरोघरी पोहोचवतो. आमचे लसीकरण करावे, असे शासनाने निर्देश केलेले आहेत. मात्र, याबाबत कंपनीही पुढाकार घेत नाही आणि लसीकरण झाले तरी ग्राहकांनी आपापल्या परिसराची कल्पना लक्षात घेऊन होम डिलिव्हरी करणाऱ्यांच्याही आरोग्याचा विचार करून तसे वर्तन करावे.    -उमासिंग झिंगरू

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या