शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

उद्घाटनाआधीच कोपरी पुलास पडले तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:27 IST

ठाणे : शहरातील कोपरी पुलाचे काम पूर्णत्वास येत असून लवकरच उद्घाटन होणार आहे. मात्र, मुंबईकडे जाणाऱ्या या पुलावरील लेनवर ...

ठाणे : शहरातील कोपरी पुलाचे काम पूर्णत्वास येत असून लवकरच उद्घाटन होणार आहे. मात्र, मुंबईकडे जाणाऱ्या या पुलावरील लेनवर तडे आणि पुलाखालील भागही कमकुवत असल्याचा प्रकार मनसेने उघडकीस आणला. हा प्रकार लक्षात घेऊन मनसेने एमएमआरडीएकडे आयआयटीमार्फत ऑडिटची मागणी करणारे निवेदन बुधवारी दिले.

या पुलाची पाहणी मंगळवारी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली. यावेळी शहर अध्यक्ष रवींद्र मोरे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या पुलाला मध्यभागी तडे गेल्याची तक्रार मनसेकडे संदीप कदम या नागरिकाने केली होती. त्यानुसार मनसेने पाहणी केल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आल्याचे जाधव म्हणाले. विशेष म्हणजे पुलाखाली असलेले कपस्टोनही तुटलेले दिसत असून हा भाग कमकुवत झाल्याची माहिती समोर आली. या पुलावरून रोज शेकडो वाहने ये-जा करणार असून अवजड वाहनेही जाणार आहेत. त्यांचा भार हा पूल घेऊ शकणार नाही. या पुलाची दैना पाहता आम्ही उदघाटन होऊ देणार नाही, असा इशारा जाधव यांनी दिला.

-----------------------------

आयआयटीमार्फत जोपर्यंत या पुलाचे ऑडिट होत नाही तोपर्यंत उद्घाटन करू नये. यामध्ये अधिकारी दोषी आहेत. या पुलाची पाहणी करताना नेते आणि अधिकारी होते, त्यांच्या नजरेत ही गोष्ट का आली नाही? या प्रकरणाची चौकशी झाली तर अनेक जण निलंबित होतील.

- अविनाश जाधव