- पंकज राऊत, बोईसरतारापूर अणुउर्जा केंद्र एक व दोन मध्ये सहा एप्रिलला मोहनदास कोरे या कर्मचाऱ्याचा फोर्कलिफ्ट खाली चिरडून जागीच झालेला मृत्यू हा सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसविल्यानेच झाल्याचा आरोप मृत कोरे यांच्या पत्नीने करून या अपघाताची सखेल चौकशी करून सर्व दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, मृताच्या मुलाने तारापूर अणूउर्जा केंद्राचे प्रशासन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असून पुरावे नष्ट केल्याचा आरोप केला आहे. एकंदर कोरे यांच्या अपघाती मृत्यूनंतर संवेदनशिल अशा अणुऊर्जा केंद्रातील सुरक्षिततेबाबत काही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.मृत कर्मचारी कोरे यांची पत्नी मनिषा कोरे यांनी तारापूर पोलिसांना दिलेल्या निवेदनात अपघाताची माहिती दुरध्वनी वरून आम्हास सांगताना माझ्या पतीचीच चुक असल्याचे सांगण्यात आले, तर तारापूर येथील प्रा. आ. केंद्रात शवविच्छेदन घाई घाईत करण्यांत येत असल्याचे माझा मुलागा जलेश यास लक्षात आल्याने त्याने संशय व्यक्त करून अपघाताच्या ठीकाणी पाहण्याची मागणी केली. त्याला प्रथम नकार देऊन हट्ट धरल्यानंतर त्यास अणुकेंद्रात नेण्यात आले. परंतु मुख्य प्रवेशद्वारावरच अर्धा तास बसवून ठेवण्यात आले. आणि जेव्हा अपघातास्थळ दाखवले तेव्हा, तेथे एकही पुरावा शिल्लक नसल्याचा आरोप पत्नी मनिषा यांनी केला आहे. अपघाताची जागा धुवून पुरावा पुर्ण पणे नष्ट करण्याचा प्रयतन केला. अपघाताचे ठिकाणीही प्रथम चुकीचे दाखविण्यांत आले. तर पंचनाम्यासाठी काढलेल्या फोटो बघण्याची विनंती केल्यानंतर आपली दिशाभूल केल्याचे त्याच्या निदर्शनास आले. अशी आहे काटेकोर सुरक्षेची नियमावलीसुरक्षा प्रथम उत्पादन नंतर एनपीसीआयएल अणुभट्ट्यांच्या सुरिक्षतेला सर्वात जास्त महत्व देते. म्हणूनच ‘सुरक्षा प्रथम उत्पादन नंतर’ हा त्यांचा नारा आहे. प्रचालानासाठी अतिशय विस्तृत आणि काटेकोरपणे सुरक्षा आचार नियमावली ठरवून कोणत्याही परिस्थितीत अणुभट्टी सुरिक्षत राहील याची संपूर्ण दक्षता घेतली जाते.अणुभट्टीच्या सुरिक्षततेबाबत सर्व माहिती देणारा दस्ताऐवज म्हणजे ‘प्राथमिक सुरक्षा विश्लेषण अहवाल’ (प्रिलिमिनरी सेफ्टी अँनालिसिस रिपोर्ट) या सुरक्षा विश्लेषणात साधारण प्रचलन, अपघाती अवस्था किंवा इतर कोणतीही शक्य, अशा अवस्थांमध्येही अणुभट्टी कशी पूर्णपणे सुरिक्षत आहे.हे आंतरराष्ट्रीय मानदंड आणि नियमांनुसार सिद्ध केले जाते. त्याचप्रमाणे प्रचालनामध्ये आणि देखभालीमध्येही किरणोत्साराचे सारे स्त्रोत योग्य प्रकारे बंदिस्त असतात व त्यांच्यावर सतत लक्ष ठेवले. जाते अणुभट्टीची एवढी सुरक्षितता सांभाळताना मात्र बाह्य सुरिक्षतेकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.सीसीटीव्ही फुटेजमध्ये फोर्क लिफ्टचा वेग जास्तअपघाताबाबत संशय वाढत जाऊन मुलाने या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज बघण्याची मागणी केली. त्या फूटेजमध्ये ज्या फोर्कलिफ्टवर सामान ठेवले होते त्या सामानामुळे चालकास पुढचे काहीच दिसत नव्हते तसेच त्या चालकाला दिशा दाखविण्यासाठी तसेच मार्गदर्शन करण्यासाठी तेथे एकही मनुष्य नव्हता, शिवाय त्या लिफ्टचा वेगही जास्त असल्याचे दिसले त्यामुळे या घटनेत जबाबदार असलेल्या चालकसह सर्वांवर कारवाईची मागणी मनिषा कोरे यांनी केली आहे.कोरे कुटुंबाची शोकांतिका मृत मोहनदास यांनी १९८५ साली तारापूर अणुऊर्जा केंद्रात प्रति महिना साठ रु पये अश्या पगारावर नोकरीस सुरु वात केली. त्यांची एकूण बत्तीस (३२) वर्ष नोकरी झाली होती तर ते पुढील वर्षी ३० नोव्हेंबर २०१८ या दिवशी निवृत्त होणार होते.कोरे यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, सून व नातू असा परिवार असून मुळचे उनभाटचे असलेले कोरे यांची पूर्वी अत्यंत गरीब परिस्थिती होती. त्या परिस्थितीवर मात करून त्यांनी त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण दिले. या घटनेमुळे घरातील कर्ता पुरु ष व आधारस्तंभ गमावला असून कोरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे तर सुरक्षा विभागाच्या निष्काळजी पणामुळे कोरे कुटुंबाचा आर्थिक आधार निखंडाला आहे.फोर्कलिफ्ट वरून मालाची वाहतूक करतांना कोणते स्टँन्डर्ड आॅपरेटींग प्रोसीज (एसओपी) चे पालन होणे अपेक्षित होते त्याची सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अंमलबजावणी केली की नाही याची जबाबदारी कोणावर होती, याचा संपुर्ण तपशिल प्राप्त झाल्यानंतर पडताळणी करून त्यामध्ये कुणी दोशी आढळताच कारवाई करण्यांत येईल.-जी.डब्ल्यू बांगर, स. पोलीस निरिक्षकअणुऊर्जा केंद्रात सुरक्षिततेबाबतच्या सर्व नियमांचे पालन होत असते, या अपघाताची चौकशी सुरू असून या संदर्भा अधिक तपशिल देऊ शकत नाही.-एम.एम. वर्मा, व्यवस्थापक, मनुष्यबळ विभाग, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प
कोरेंच्या अपघाती मृत्यूला वादळी वळण?
By admin | Updated: April 14, 2017 03:08 IST