शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीसाठी सहशिक्षकाच्या धमक्या

By admin | Updated: December 25, 2015 02:26 IST

केंद्रप्रमुखाला घरी बोलवून पत्नीला त्याच्याशी लगट करायला लावून केलेले चित्रीकरण व्हॉट्सअ‍ॅपवर प्रसारित करण्याची धमकी येथील एका सहशिक्षकाने देऊन त्या केंद्रप्रमुखाकडून ४०

भरत उबाळे, शहापूरकेंद्रप्रमुखाला घरी बोलवून पत्नीला त्याच्याशी लगट करायला लावून केलेले चित्रीकरण व्हॉट्सअ‍ॅपवर प्रसारित करण्याची धमकी येथील एका सहशिक्षकाने देऊन त्या केंद्रप्रमुखाकडून ४० लाखांच्या खंडणीची मागणी केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. या दाम्पत्याकडून खंडणीकरिता वारंवार मागणी सुरू झाल्याने केंद्रप्रमुखाने आपण आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून घर सोडले आहे. सध्या पोलीस त्याचा शोध घेत असून धमकी देणाऱ्या शिक्षक दाम्पत्याला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.आटगाव येथे वास्तव्यास असलेले केंद्रप्रमुख वासुदेव हरी निमसे (४९) ज्या शाळेत नोकरी करतात, तेथेच एक शिक्षक दाम्पत्य नोकरी करते. एक दिवस बाजारपेठेत निमसे यांची त्या दाम्पत्याशी भेट झाली, तेव्हा त्यांनी त्यांना घरी येण्याचा आग्रह केला. घरी गेल्यावर त्या सहशिक्षकाने आपल्या पत्नीला निमसे यांच्याशी लगट करायला भाग पाडले. त्याचे स्वत: चित्रीकरण केले. त्यानंतर, ही चित्रफीत व्हॉट्सअ‍ॅपवर प्रसारित करण्याची धमकी देऊन ४० लाखांच्या खंडणीची मागणी केली. निमसे यांनी भीतीपोटी १० लाखांची खंडणी या दाम्पत्याला दिली. मात्र, उर्वरित ३० लाख रुपये देण्याची मागणी या दाम्पत्याने सुरू केल्याने निमसे हे मानसिक दबावाखाली आले.बुधवारी सकाळी निमसे घराबाहेर पडले. मात्र, रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने त्यांच्या पत्नीने पोलिसांकडे ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी निमसे यांच्या घराची झडती घेतली असता त्यांना त्यांनी लिहिलेली सुसाइड नोट आढळली. त्यामध्ये सहशिक्षकांकडून खंडणीकरिता दिल्या जात असलेल्या धमक्यांना कंटाळून आपण माहुली किल्ल्याच्या जंगलात जाऊन आत्महत्या करीत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. निमसे यांच्या सुसाइड नोटमुळे अक्षरश: खळबळ उडाली आहे.