शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या सपारांची निवड वादात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 03:03 IST

काँग्रेसच्या प्रभाग २२ अ मधील उमेदवार उमा सपार यांच्या बिनविरोध निवडीवर शिवसेनेच्या उमेदवार दक्षा गुप्ता यांनी आक्षेप घेतला आहे.

भार्इंदर : काँग्रेसच्या प्रभाग २२ अ मधील उमेदवार उमा सपार यांच्या बिनविरोध निवडीवर शिवसेनेच्या उमेदवार दक्षा गुप्ता यांनी आक्षेप घेतला आहे. सपार यांनी उमेदवारी अर्जात निरक्षर असल्याचे नमूद केले असून जात प्रमाणपत्रासाठी मात्र शाळेचा दाखला जोडला असल्याचा दावा करत त्यांची बिनविरोध निवड रद्द करण्याची मागणी गुप्ता यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.सपार या इतर मागासवर्गीय प्रवर्गातील असून त्यांनी २००२ व २००७ मधील निवडणूक काँग्रेसच्याच तिकिटावर लढवली होती. २००२ मधील निवडणुकीत त्यांनी निरक्षर असल्याचे उमेदवारी अर्जात नमूद केले होते. परंतु, जातप्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांनी शाळेचा दाखला जोडल्याचा दावा यंदाच्या निवडणुकीतून बाहेर पडलेल्या शिवसेनेच्या उमेदवार गुप्ता यांनी केला आहे. यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना दक्षा यांनी ओबीसी या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभाग २२ अ या जागेसाठी शिवसेनेतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दक्षा यांच्याकडे जातपडताळणी प्रमाणपत्र नसल्याने त्यांनी ऐन निवडणुकीच्या काळात त्यासाठी अर्ज केला होता. परंतु, अर्ज केल्याचा पुरावाही त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केला नाही. त्यामुळे त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी पुरावा सादर करण्यासाठी अर्ज छाननीपर्यंतची वेळ दिली होती. परंतु, त्या वेळेनंतरही दक्षा यांनी पुरावा सादर करण्याचा प्रयत्न केला असता तो निवडणूक निर्णय अधिकाºयांनी नियमावर बोट ठेवत नाकारला. परिणामी, दक्षा यांचा उमेदवारी अर्ज रद्द ठरवला गेला. यामुळे सपार यांची बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट झाले. आपला नाहक बळी गेल्याची भावना निर्माण झाल्याने दक्षा यांनी सपार यांच्या बिनविरोध निवडीवरच आक्षेप घेतला आहे. सपार यांच्या जातप्रमाणपत्रावेळी सादर केलेल्या शिक्षणाच्या पुराव्यावरच संशय व्यक्त करत त्याची चौकशीची मागणी केली आहे.>प्रभाग १०, १२ मध्ये तीन हजार बोगस मतदारभार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीत प्रभाग १० व १२ मध्ये अनुक्रमे १४०० व १६३६ बोगस मतदारांची नावे मतदारयादीत घुसवण्यात आली, असा आरोप मीरा-भार्इंदर काँग्रेसचे निरीक्षक राजेश शर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. यात भाजपाचा हात असल्याचा दावा केला आहे. काँग्रेसने यापूर्वीच भाजपाकडून बोगस मतदारांची नोंद होत असल्याबाबतची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने ११ हजार बोगस नावे मतदारयादीतून वगळण्याचे निर्देश निवडणूक प्रशासनाला दिले होते. यानंतरही प्रभाग १० व १२ मध्ये एकूण ३०३६ बोगस मतदारांची नोंद अद्याप मतदारयादीत कायम ठेवल्याचे उघडकीस आले आहे. या प्रभागातील काँग्रेस उमेदवारांच्या सर्वेक्षणातून बोगस मतदारांच्या नावांचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. बहुतांश बोगस मतदारांचे मतदान केंद्र आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन स्क्वेअर अकॅडमी शाळेत असल्याचा दावा शर्मा यांनी केला आहे. याविरोधात निवडणूक निर्णय अधिकाºयांसह पोलीस व राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु, स्थानिक निवडणूक प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. प्रशासन सत्ताधारी भाजपाच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेस पक्ष भाजपाखेरीज इतर सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन या बोगस मतदारांमार्फत मतदान करून घेण्याचा डाव हाणून पाडणार आहे, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला प्रदेश प्रतिनिधी मेहुल व्होरा, माजी महापौर तुळशीदास म्हात्रे, काँग्रेसचे उमेदवार उपस्थित होते.>काँग्रेसच्या उमा सपार यांनी उमेदवारी अर्जात नमूद केलेली माहिती विसंगत असल्यानेच त्यांच्या चौकशीची मागणी आयोगाकडे केली आहे. त्याला दाद न मिळाल्यास न्यायालयात दाद मागणार आहे.- दक्षा गुप्ता, शिवसेना उमेदवार>काँग्रेसच्या उमा सपार यांनी दोनवेळा निवडणुका लढवल्या असून यंदा त्यांनी बिनविरोध विजय मिळवला आहे. तत्पूर्वी त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना कोणतीही माहिती लपवलेली नाही.- अनिल सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष