शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवाराच्या पतीची वादग्रस्त चित्रफीत

By admin | Updated: February 18, 2017 07:07 IST

शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या दिव्यामधील नगरसेविका सुनीता मुंडे यांचे पती गणेश मुंडे यांची वादग्रस्त

ठाणे : शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या दिव्यामधील नगरसेविका सुनीता मुंडे यांचे पती गणेश मुंडे यांची वादग्रस्त चित्रफीत मतदानाला तीन दिवस शिल्लक असताना व्हायरल झाली आहे. यामध्ये अनधिकृत बांधकामे वाचवण्यासाठी मुंडे एका व्यक्तीकडून पैसे मागत असल्याचे दिसत असून यामुळे दिव्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. ही चित्रफीत निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणार असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे, तर गणेश मुंडे यांनी मात्र ही चित्रफीत पूर्णपणे बनावट असल्याचा दावा केला असून पराभवाच्या भीतीनेच हे प्रकार जाणूनबुजून होत असल्याचा दावा केला आहे. वाढलेल्या जागांमुळे पालिकेच्या सत्तेमध्ये महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरलेल्या दिव्याकडे सर्वच राजकीय पक्षांनी आपले लक्ष केंद्रित केले असून यामध्ये मनसे आघाडीवर आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी जाहीर सभा घेऊन येथील अनधिकृत बांधकामांच्या मुद्यावरून सत्ताधारी शिवसेनेवर सडकून टीका केली होती. आता याच मुद्यावरून पूर्वी मनसेच्या नगरसेविका असणाऱ्या सुनीता मुंडे यांचे पती गणेश मुंडे यांची एक वादग्रस्त चित्रफीत मनसेच्याच पदाधिकाऱ्यांनी उघड केली आहे.ठाण्याचे मनसेचे संपर्कप्रमुख अभिजित पानसे आणि शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही चित्रफीत सादर केली. त्यामध्ये अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्यासाठी मुंडे हे समोरच्या व्यक्तीकडून पैसे मागत असल्याचे संभाषण ऐकू येत आहे. निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतरची ही चित्रफीत असून समोरची व्यक्ती कोण आहे, नेमका हा काय प्रकार आहे, याचा खुलासा लवकरच होईल, असा दावा जाधव यांनी केला. (प्रतिनिधी)शिवसेनाच न्याय देईल असा विश्वास : मुंडेमुंडे यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले असून हा सर्व बनाव असल्याचे सांगितले. पाच वर्षे नगरसेवकपदाची यशस्वी वाटचाल आपण केली असून हा केवळ आपल्याला बदनाम करण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्याकडूनच अनेक जण मदत घेऊन जात असतात. मनसेमध्ये असताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नाही. शिवसेनाच खरा न्याय देईल, या आशेने शिवसेनेमध्ये प्रवेश केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.