शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदार भाजपा महिला मंत्र्यांचाच

By admin | Updated: July 9, 2017 01:52 IST

राज्य मंत्रिमंडळातील एक महिला मंत्री व सत्ताधारी भाजपाच्या सहकारी पक्षाचा एक मंत्री राधेश्याम कथोरिया याला परिवहन सेवेचे कंत्राट मिळावे याकरिता फोन करीत

लोकमत न्यूज नेटवर्कभाईंदर : राज्य मंत्रिमंडळातील एक महिला मंत्री व सत्ताधारी भाजपाच्या सहकारी पक्षाचा एक मंत्री राधेश्याम कथोरिया याला परिवहन सेवेचे कंत्राट मिळावे याकरिता फोन करीत असल्याचा पलटवार सेनेने केला आहे. आ. मेहता यांनी पोलिसांना पकडून दिलेला लाच प्रकरणातील लिपीक आनंद गबाळे हा मेहता यांच्याच कर्मचारी संघटनेचा सदस्य आहे, याकडे सेनेने लक्ष वेधले. भाजपाच्या अंतर्गत राजकारणातून ठेकेदाराला अटक करवण्यात आल्याचे शिवसेनेचे मत असून अन्य पक्षांना लाच दिल्याचा दावा हा अन्य पक्ष व नेते यांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे, असे शिवसेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. याबाबत सेना आ. प्रताप सरनाईक म्हणाले की, आ. मेहतांनी हिंमत असेल तर लाच घेणाऱ्यांची नावे जाहीर करावी. निवडणुकीच्या तोंडावर असले हीन प्रकार करुन राजकीय फायदा घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. सत्य काय ते पोलीस चौकशीत बाहेर येईलच. उगाच आरोप करणे चुकीचे आहे. मीरा-भाईंदर शहरात सर्वात भ्रष्टाचारी, मनमानी करणारा कोण नेता आहे, असे शेमड्या पोराला जरी विचारले तर तो एकाच व्यक्तीचे नाव सांगेल, असा टोला काँग्रेस नगरसेवक प्रमोद सामंत यांनी आ. मेहता यांना नामोल्लेख न करता लगावला.शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांनी काही वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेतील टक्केवारीच्या राजकारणाचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर राज्य सरकारने नंदलाल समिती नियुक्ती करून चौकशी केली होती. आता मीरा-भाईंदर महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. महापालिकेत भ्रष्टाचार वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. ई-टेंडरींग पध्दत लागू करुन कामकाजात खऱ्या अर्थाने पारदर्शकता आणायला हवी.- गीता जैन, महापौर, मीरा-भाईंदर महापालिकामहापालिकेत भ्रष्टाचार वा टक्केवारीचे राजकारण चालत नाही. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदार व कर्मचारी या दोघांना अटक केली असून तपास सुरु आहे. अंतिम निष्कर्ष आल्यावर बोलणे उचित होईल.- डॉ. नरेश गीते, आयुक्त मीरा-भाईंदर महापालिका