शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

वाडा येथे काँग्रेसची उग्र निदर्शने

By admin | Updated: May 24, 2017 00:47 IST

सत्तेवर येऊन तीन वर्षे होत आली तरी जनतेला दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्ती मोदी सरकारला व फडणवीस सरकारला करता न आल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने मंगळवारी येथे जोरदार निदर्शने केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : सत्तेवर येऊन तीन वर्षे होत आली तरी जनतेला दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्ती मोदी सरकारला व फडणवीस सरकारला करता न आल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने मंगळवारी येथे जोरदार निदर्शने केली.महागाईच्या वणव्यात सामान्य जनता होरपळत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसागणिक वाढत आहेत तर सीमेवर रोज जवान शहीद होत असल्याने सर्वच आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरल्याच्या विरोधात कॉंग्रेस पक्षाने जिल्हाध्यक्ष केदार काळे यांच्या नेतृत्वाखाली वाड्यातील खंडेश्वरी नाक्यावर जोरदार निदर्शने केली. केंद्रात सत्तेवर येतांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वसामान्य मतदारांना भुलविण्यासाठी प्रचंड आश्वासने दिलीत. सरकारला ३ वर्ष पूर्ण होत आहेत मात्र जनतेच्या हिताच्या कोणत्याही योजना हे सरकार राबवू शकलेले नाही. कॉंग्रेस सरकारने केलेल्या योजनांची उद्घाटने करून त्याचे श्रेय लाटत आहे. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा होणार होते ते झाले का? असा सवाल कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे यांनी केला. देशाच्या सीमेवर रोजच जवान शहीद होत असतांना एकाच्या बदल्यात दहा मुंडकी आणण्याची भाषा करणारे पंतप्रधान मोदी आता काय करीत आहेत अशी उपरोधिक टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, शेतकरी आत्महत्या करतात, कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची भाषा करणारे आता मूग गिळून बसलेत मद्य विक्रीतील घटलेला महसूल भरून काढण्यासाठी पेट्रोल डीझेलची दरवाढ करून सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचे काम या सरकारने केल्याने येत्या निवडणुकीत जनताच या सरकारला पायउतार करेल असे सांगितले. आगामी काळात भाजप सरकारविरोधात कॉंग्रेस पक्ष तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. या आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, कुणबी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, धांगे, कैलास पाटील, डॉ. विकास पाटील, लोकेश पाटील, राजू पातकर, जितेश पाटील आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदाराना दिले.