शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरचे सर्व प्रश्न काँग्रेस पक्ष सोडवणार

By admin | Updated: February 14, 2017 02:42 IST

उल्हासनगरमधील सर्व मूलभूत समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन देणारा काँग्रेसचा जाहीरनामा रविवारी प्रकाशित करण्यात आला.

उल्हासनगर : उल्हासनगरमधील सर्व मूलभूत समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन देणारा काँग्रेसचा जाहीरनामा रविवारी प्रकाशित करण्यात आला. उल्हासनगरचे मतदार सुज्ञ असून ते या जाहीरनाम्याची दखल घेतील, असे नेत्यांनी या वेळी जाहीर केले. प्रवक्ते सुभाष कानडे आणि कॅप्टन निलेश पेंढारी यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रकाशित झाला. उल्हासनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयराम लुल्ला यांच्या नेतृत्वाखाली या समस्यांचा अभ्यास करण्यात आला. त्या सोडवण्यासाठी त्यांचा जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला. या वेळी सर्व उमेदवार हजर होते. मोफत आणि २४ तास पाणी देण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात आहे. शहर सुंदर आणि स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. खड्डेमुक्त सिमेंट काँक्रिट रस्ते, रुग्णालय, चांगल्या आरोग्य सेवा, ब्लडबँक, अतिदक्षता विभाग निर्माण करणे, २०० बेडचे स्वतंत्र रुग्णालय, शिक्षण विभागामार्फत मोफत शैक्षणिक सुविधा, संगणकीकृत शैक्षणिक सुविधा, प्रत्येक प्रभागात स्वतंत्र अभ्यासिका, शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न निकाली काढणे, झोपडपट्टीचा सुनियोजित विकास करून जीवनमान उंचावणे, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी मैदान उपलब्ध करणे, गोलमैदान आणि सपना गार्डनमध्ये इनडोअर गेम्स, ओपन जिम, प्रत्येक प्रभागासाठी लोकपाल समितीची स्थापना करून कामांवर लक्ष ठेवणे आणि भ्रष्टाचार रोखण्याचे काम करणे. प्रत्येक प्रभागात लोकसेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांची कामे एकाच ठिकाणी करण्यात येणार असल्याचे त्यात म्हटले आहे. मुस्लिमांसाठी स्वतंत्र दफनभूमी, सर्व शाळांचे नूतनीकरण, प्रत्येक प्रभागात ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, शहरात भाजी आणि मच्छी मार्केट उभारणे, डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सोडवणे आणि शहर वायफायने जोडणे आदी आश्वासनांचा समावेश या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. या वेळी सुभाष कानडे, निलेश पेंढारी, जयराम लुल्ला, जया साधवानी, रोहित साळवे, आजाद शेख, गोपी हसिजा आणि रवींद्र श्रीवास्तव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)