शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस पक्ष म्हातारा झाला, अबू आजमी यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:29 IST

मुंब्रा : काँग्रेस पक्ष हा म्हातारा झाला असून, त्यांच्याकडील नेतृत्व संपले असल्याने हा पक्ष आता उठणार नसून जुने मुद्दे ...

मुंब्रा : काँग्रेस पक्ष हा म्हातारा झाला असून, त्यांच्याकडील नेतृत्व संपले असल्याने हा पक्ष आता उठणार नसून जुने मुद्दे घेऊनच पक्ष चालला असल्याची टीका समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आजमी यांनी बुधवारी रात्री ठाणे जिल्ह्यातील मुस्लीमबहुल मुंब्य्रात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली.

आमचा पक्ष (समाजवादी) छोटा झाला तरी चालेल. परंतु, आम्ही भाजपला सहन करणार नाही. भाजपला रोखण्यासाठी राज्यात आम्ही समर्थन दिलेले महाविकास आघाडीचे सरकार आमच्या बरोबर अन्याय करीत असून, मोठे राजकीय पक्ष छोट्या राजकीय पक्षांना गिळंकृत करत असल्याचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. आगामी ठामपाची निवडणूक पक्ष स्वबळावर लढवणार असून, मुंब्रा-कौसा परिसरातील सर्वच्या सर्व १९ प्रभागांतून तसेच ठाणे शहरातून १० प्रभागांमधून पक्ष उमेदवार उभे करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पक्ष मजबूत करण्यासाठी वसाहती तसेच घरोघरी जाणार असल्याचेही ते म्हणाले. स्थानिक मतदारांनी जास्तीत जास्त नगरसेवक निवडून दिल्यास हाॅकर्स झोन, शाळा, रुग्णालय आदी स्थानिक मुद्द्यावर काम करणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी यावेळी केले. पक्षाचे विभागीय अध्यक्ष आदिल खान तसेच इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.