शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादी आमनेसामने लढणार

By admin | Updated: February 4, 2017 03:31 IST

ठाणे महापालिका निवडणुकीत काँग्रेसने आजी-माजी सहा नगरसेवकांना रिंगणात उतरवले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला गळती लागल्याने बहुतांश ठिकाणी

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत काँग्रेसने आजी-माजी सहा नगरसेवकांना रिंगणात उतरवले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला गळती लागल्याने बहुतांश ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. मुंब्रा, कळवा यासारख्या परिसरात राष्ट्रवादीसमोर काँग्रेस आणि काँग्रेससमोर राष्ट्रवादी आमनेसामने आहेत. काँग्रेसने शहराध्यक्ष मनोज शिंदे आणि त्यांच्या भावाला तिकीट दिले आहे. काही जागांचा तिढा सुटत नसल्याने शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसने उमेदवारयादी गुलदस्त्यात ठेवली होती. शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने सकाळी पक्षाने उमेदवारी नक्की झालेल्यांना एबी फॉर्मवाटप केले. सुमारे ६० जागांवर उमेदवारी दिली असून त्यामध्ये ७० टक्के नवे चेहरे आहेत. त्यामुळे ५० टक्के महिला आहेत, असे काँग्रेस शहर सरचिटणीस विजय हिरे म्हणाले. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीचे ८३ अर्ज- शिवसेना-भाजपाच्या यादीची अखेरपर्यंत वाट पाहत बंडखोरी टाळण्यासाठी व्यूहरचना करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. अगदी अखेरच्या क्षणी शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या नगरसेविका स्रेहा पाटील यांच्यासह सर्वच विद्यमान नगरसेवकांना संधी दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी दिली.यामध्ये हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला, मुन्ना बिष्ट, सुहास देसाई, मिलिंद पाटील यांच्यासह विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरेंच्या स्रुषा नीलिमा डावखरे यांनाही संधी देण्यात आली आहे. तसेच शिवसेनेतून बंडखोरी करणारे बाळा घाग आणि संगीता घाग अशा ८३ उमेदवारांचा समावेश आहे.