शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

बुथस्तर यंत्रणेवर पक्षांची भिस्त

By admin | Updated: February 21, 2017 05:44 IST

गेले १५ दिवस सुरू असलेल्या विविध पक्षांच्या प्रचारानंतर आता मतदारांना मतदानाकरिता बाहेर काढण्यासाठी बुथस्तरावरील

ठाणे : गेले १५ दिवस सुरू असलेल्या विविध पक्षांच्या प्रचारानंतर आता मतदारांना मतदानाकरिता बाहेर काढण्यासाठी बुथस्तरावरील संघटना सक्रिय करणे, चाणाक्ष पोलिंग एजंट नियुक्त करणे, अशा सर्व यंत्रणा सुसज्ज करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शिवसेना आणि भाजपाच्या वतीने यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. प्रत्येक बुथकरिता एका व्यक्तीवर जबाबदारी सोपवली असून त्याच्या हाताखाली कार्यकर्ते दिमतीला दिले आहेत. मतदानाच्या दिवशी मतदाराला बाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. शिवसेनेने पहाटेपर्यंत ठाण्यातील एका अज्ञातस्थळी विविध पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यामध्ये शिवसेनेचे आमदार, खासदार आदींसह महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. यात मतदारयादीतील घोळाबरोबरच कोण कुठे ताकदवान आहे आणि कोण कुठे कमकुवत आहे, याची चाचपणी करण्यात आली आहे. त्यानुसार, एखादा उमेदवार कमजोर असेल, तर त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्यात यावे, अशा सूचना दिल्या आहेत. याशिवाय, येथील अधिकाधिक मतदारांना बाहेर कसे काढता येईल, यासाठी व्यूहरचना आखण्यात आली. पोलिंग एजंटपासून बुथ एजंटपर्यंतच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून सुमारे दोन हजारांहून अधिकचे एजंट नेमण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली. दुसरीकडे भाजपानेदेखील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच विधानसभेत कोणत्या भागातून भाजपाला अधिकची मते मिळाली, त्या भागावर अधिक लक्ष केंद्रित केल्याची माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली. तसेच मतदाराला बाहेर काढण्यासाठी बुथ आणि इतर पदाधिकाऱ्यांना विशेष जबाबदारी दिली आहे. ज्या भागात भाजपा दुसऱ्या क्रमांकावर होती, त्या ठिकाणचे मतदान कसे वाढवता येईल, यासाठी प्रयत्न सुरू असून प्रचार संपल्यापासून गुप्त बैठकांवर अधिक प्रमाणात जोर देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)ण आमचे १४५० पोलींग एजंट तयार आहेत आणि मतदान केंद्रांच्या बाहेर मनसेचे ३५० बुथ लागतील असे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले. कार्यकर्ते सकाळी स्वत: मतदान करतील आणि त्यानंतर सकाळीच मतदान करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करतील.