शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

संगणक दोन महिन्यांपासून धूळखात

By admin | Updated: February 17, 2017 02:01 IST

महाराष्ट्र शासनाची २०११-१२ मध्ये सुरू केलेली आयसीटी योजना बंद झाल्याने शाळांतील लाखो रुपयांची संगणक यंत्रणा

भातसानगर : महाराष्ट्र शासनाची २०११-१२ मध्ये सुरू केलेली आयसीटी योजना बंद झाल्याने शाळांतील लाखो रुपयांची संगणक यंत्रणा आज अक्षरश: धूळखात पडून आहे. दुसरीकडे शालेय अभ्यासक्रमात मात्र संगणक विषयाचा समावेश आहे. त्यामुळे संगणक असूनही नियोजनाअभावी विद्यार्थी प्रत्यक्ष संगणकहाताळणीपासून वंचित राहणार आहेत.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक हाताळता यावा, त्याची माहिती व्हावी, यासाठी २०११-१२ पासून शिक्षण संचालनालय (माध्यमिक आणि उच्च माध्यमिक) यांच्या माध्यमातून संगणक प्रयोगशाळेचा (आयसीटी) प्रयोग सुरू करण्यात आला. शहापूर तालुक्यातील १३ शाळांमध्ये ही योजना सुरू झाली. त्यासाठी एक प्रशिक्षित शिक्षकही देण्यात आल्याने हजारो विद्यार्थी या संगणकहाताळणीत यशस्वी झाले. त्यानंतर, अभ्यासक्रमात संगणक विषयाचा समावेश झाल्याने शासनाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरत होता. मात्र, डिसेंबरमध्ये अचानक हा उपक्रमच बंद झाल्याने लाखो रुपयांची ही सामग्री आजही तालुक्यातील शाळांमध्ये धूळखात पडून आहे. या उपक्रमासाठी शाळेत एक वेगळी संगणक रूमही तयार करण्यात आली होती. स्वतंत्र खोली असल्याने आठवड्यातील संगणकाच्या दोन तासांसाठी विद्यार्थी प्रत्यक्ष संगणक हाताळत होते. वाचन, लेखन यापेक्षा कृतीतून मिळणारे शिक्षण त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. मात्र, आता हा उपक्रम बंद झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी आता पालकांमधून जोर धरत आहे. (वार्ताहर)