शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

बोईसरला३७५ आदिवासींचा सामूहिक विवाह

By admin | Updated: May 24, 2017 00:49 IST

आधार प्रतिष्ठान व शिवसेना पालघर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजने अंतर्गत आदिवासी समाजातील गरीब, गरजू व दारिद्र्य रेषेखालील

पंकज राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : आधार प्रतिष्ठान व शिवसेना पालघर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजने अंतर्गत आदिवासी समाजातील गरीब, गरजू व दारिद्र्य रेषेखालील ३७५ वधू-वरांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या धूम धडाक्यात बोईसरला संपन्न झाला. या सोहळ्यात पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण दुर्गम भागातील बहुसंख्य आदिवासी जोडपी सहभागी झाले होते.या प्रसंगी खासदार राऊत यांनी मुलीच्या लग्ना करीता घेतलेल्या कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात असे सांगून गोर गरीब अदिवासींकरीता आधार प्रतिष्ठान आयोजित करीत असलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे कर्ज मुक्त लग्न व संसार सुखी होण्यास निश्चित मदत होईल अशी आशा व्यक्त करून या उपक्रमामुळे गोरगरीबांचे संसार फूलल्याचे गौरोदगार काढले. आधार प्रतिष्ठानामार्फत वधूला साडी, मेकअप बॉक्स, पादत्राणे, वरांसाठी कपडे तसेच टॉवेल, चादर, बेड शीटस्, आणि संसारपयोगी भांडी पाहुण्याच्या हस्ते देण्यात आली.आधार प्रतिष्ठानच्या सामुदायिक विवाह सोहळयात आता पर्यंत २३०० जोडपयांच्या विवाह पार पडला असून सावकाराकडून कर्ज घेऊन लग्न करण्याच्या प्रवृत्तीस सामुदायिक लग्नाच्या माध्यमातून आळा बसून ते कुटुंब वेठबिगारीतून मुक्त होईल असे आधार प्रतिष्ठानचे सचिव जगदीश धोडी यांनी सांगितले.बोईसरच्या इराणीवाडी मैदानावर आयोजिलेल्या या विवाह सोहळ्याला शिवसेनेचे उपनेते अनंत तरे, आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र सिंग, सचिव जगदिश धोडी, पालघर जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधिक्षक बी. जी.यशोद, शिवसेना पालघर जिल्हाचे सहसंपर्क प्रमुख केतन पाटील, युवसेना पालघर जिल्हा निरीक्षक केदार दिघे, शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख शिरीष चव्हाण, माजी जिल्हा प्रमुख उदय बंधू पाटील व प्रभाकर राऊळ, आमदार अमित घोडा, बोईसरचे उपविभागीय पोलिस अधिकारी फत्तेसिंग पाटील, पालघर जि. प. उपाध्यक्ष सचिन पाटील, उपजिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, पालघर जिल्ह्याच्या महिला संघटक ज्योती ठाकरे, युवासेनेचे पालघर जिल्हयाचे युवा अधिकारी अ‍ॅड. परीक्षीत पाटील, पालघर तालुका प्रमुख सुधीर तामोरे, पालघर पं. स.चे सभापती रवींद्र पागधरे, उपसभापती मनोज संखे, आधार प्रतिष्ठान चे पदाधिकारी प.स. सदस्य मुकेश पाटील, बोईसर शहर प्रमुख निलम संखे, आधार महेश जाधव, आंनद धोडी व अशोक भोईर आदि मान्यवर तसेच वधूवरांचे नातेवाईक तसेच त्यांचया गावातील अनेक वऱ्हाडी उपस्थित होते.