शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त विधानाकरिता आयुक्तांवर गुन्हा दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 01:52 IST

ठामपा सचिवांचा निर्धार : महिलांबद्दल आयुक्तांनी अपशब्द काढल्याच्या निषेधार्थ महासभा तहकूब

ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर केलेल्या टीकेचे शुक्रवारी सर्वसाधारण सभेत तीव्र पडसाद उमटले. महिला सदस्यांनी आयुक्तांच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यामुळे महापौरांनी अर्ध्या तासाकरिता कामकाज तहकूब केले. सचिव अशोक बुरपुल्ले यांनी आपण कायदेशीर सल्ला घेऊन आयुक्तांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे जाहीर केल्याने अधिकारी विरुद्ध आयुक्त संघर्ष चिघळला आहे.

अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांबाबत आयुक्तांनी अपशब्दांचा वापर केला असून ज्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर हा संदेश पाठवला आहे, त्यात महिला अधिकारी असल्याने सभागृहातील नगरसेविका कमालीच्या संतप्त झाल्या. अशा प्रकारे महिलांसंदर्भात आयुक्त अपशब्द वापरत असतील, तर त्यांच्यावर कारवाईची मागणी नगरसेविकांनी केली. शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांनीही हा मुद्दा उपस्थित केला. आयुक्तांच्या वादग्रस्त विधानाचा जो संदेश व्हायरल झाला आहे, तो नेमका काय आहे, हे सभागृहाला समजले पाहिजे, अशी मागणी करुन, त्यांनी या प्रकाराचा निषेध केला. नगरसेवक देवराम भोईर यांनीही निषेध करून ३५ वर्षांमध्ये अधिकाऱ्यांवर अशा प्रकारे वैयक्तिक स्वरूपाची हीन टीका झाली नसल्याचे सांगितले. विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनी याबाबत प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी केल्यानंतर, अधिकाºयांच्या महिला कुटुंबीयांसंदर्भात आयुक्तांनी वादग्रस्त विधान केल्याची कबुली सचिवांनी दिली. त्यामुळे महापौरांनी सभा अर्ध्या तासासाठी तहकूब केली.अर्ध्या तासानंतर सभा पुन्हा सुरू झाल्यावर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी हाच मुद्दा लावून धरला. वादग्रस्त विधान करण्याची आयुक्तांची ही पहिलीच वेळ नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आता या अधिकाºयांविरोधात वादग्रस्त विधाने केली असली, तरी हेच अधिकारी आयुक्तांच्या इशाºयावर महासभेवर बहिष्कार टाकायचे. आता ते आयुक्तांवर गुन्हा दाखल करणार का, असा प्रश्न शिंदे यांनी अधिकाºयांना विचारला.माजी महापौरांच्या या प्रश्नावर बुरपुल्ले म्हणाले की, आयुक्तांनी व्हॉॅट्सअ‍ॅप ग्रुपवर जी वादग्रस्त विधाने केली, त्याविरोधात कायदेशीर सल्ला घेऊन आयुक्तांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नजीकच्या काळात हा वाद वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.आरोपांमागे बदल्यांचे राजकारण - आयुक्तआपल्यावर केल्या जाणाºया आरोपांमागे अधिकाºयांच्या बदल्यांचे राजकारण असल्याचा आरोप पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केला आहे. अधिकाºयांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर केलेल्या वादग्रस्त विधानांबद्दल खुलासा करताना, माझ्या विधानांचा संपूर्ण विपर्यास केल्याचा दावाही त्यांनी गुरुवारी केला.थर्ड पार्टी आॅडिटमध्ये घनकचरा विभाग आणि सचिव विभागाच्या कामात अनियमितता आढळल्याने अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. याच राजकारणातून आपल्यावर आरोप करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आयुक्तांचे आरोप सचिव बुरपुल्ले यांनी फेटाळले आहेत.माझ्या संदेशात कोणाच्याही आईबहिणीविषयी विधान नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे माझ्यावर असा गुन्हा दाखल होणार, असा प्रश्न त्यांनी केला. काही रस्त्यांचे प्रस्ताव परस्पर महापौरांकडून जात असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.महापौरांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. ज्या रस्त्यांचे प्रस्ताव घेण्यात आले होते, ते पालकमंत्र्यांचे होते. विकासासाठीच प्रस्ताव घेतले, तर त्यात चूक काय, असा प्रतिप्रश्न महापौरांनी केला. माझा आयुक्तपदाचा कार्यकाळ २८ फेब्रुवारी रोजी संपत असून अधिवेशनानंतर दुसरीकडे पदस्थापना होण्याची शक्यता असल्याचे आयुक्तांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिका