शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक ड्युटी रद्द करण्यासाठी आयुक्तांना धमकी

By admin | Updated: February 18, 2017 04:25 IST

निवडणूक ड्युटी रद्द करण्यासाठी नवी मुंबई शिक्षक संघटनेचे कथित अध्यक्ष आशिष सावकारे (४५) यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल

ठाणे : निवडणूक ड्युटी रद्द करण्यासाठी नवी मुंबई शिक्षक संघटनेचे कथित अध्यक्ष आशिष सावकारे (४५) यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना गुरुवारी धमकी दिली़ या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली़ठाणे महापालिका आयुक्तांना धमकी देण्याचा मुद्दा निवडणूक प्रचारात गाजला असतानाच आपण शिक्षक संघटनेचा अध्यक्ष असल्याचे सांगून सावकारे (४५) या शिक्षकाने आयुक्तांच्या दालनातच त्यांना आव्हान देऊन धमकी दिली. निवडणूक ड्युटीचे काम रद्द करण्यासाठी त्याने आयुक्तांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व त्यांच्या अंगावर धावून गेला. सरकारी कामात अडथळा आणल्याने सुरक्षारक्षकांनी त्याला अटकाव केला. त्यांच्याशीही त्याने झटापट केली. या झटापटीनंतर ‘तुम्हाला सोडणार नाही’ अशी धमकीही त्याने दिली़ या प्रकरणी पालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक पी.एन. पाटील या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)