शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

वृक्ष प्राधिकरणची बैठक आयुक्तच घेणार

By admin | Updated: January 6, 2017 06:10 IST

वृक्ष प्राधिकरण समितीची सभा वृक्ष प्राधिकरण अधिनियमानुसार चालवण्यात यावी, असे महत्त्वपूर्ण पत्र महाराष्ट्र शासनाने ठाणे महापालिकेला पाठवले आहे

ठाणे : वृक्ष प्राधिकरण समितीची सभा वृक्ष प्राधिकरण अधिनियमानुसार चालवण्यात यावी, असे महत्त्वपूर्ण पत्र महाराष्ट्र शासनाने ठाणे महापालिकेला पाठवले आहे. त्यामुळे आता यापुढील सर्व बैठका आयुक्त घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अतिरिक्त आयुक्तांनी अशा बैठका घेऊ नये, असेही सांगण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्तांमार्फत घेण्यात येत असलेल्या बैठकीबाबत आमदार प्रताप सरनाईक यांच्या तक्रारीची दखल घेऊन राज्य शासनाने पत्र पालिकेला पाठवले आहे. आयुक्तांच्या गैरहजेरीत वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत सरसकट वृक्षतोडीला परवानगी अतिरिक्त आयुक्तांकडून दिली जात असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला होता. त्यामागे ते आणि अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्यातील संघर्षाचीदेखील पार्श्वभूमी होती. बुधवारच्या बैठकीतदेखील गोषवारा मिळाला नसल्याचे कारण पुढे केले असले तरी शिवसेनेच्या दबावानंतरच सेनेच्या सदस्यांनी ती तहकूब केली होती. दरम्यान, यासंदर्भात सरनाईक यांनी राज्य शासनाकडे पत्र पाठवून या सर्व प्रकरणांची दखल घेऊन या बैठकीला स्थगिती देण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्याची तत्काळ दखल घेऊन राज्य शासनाने बुधवारी होणाऱ्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीला स्थगिती देऊन अध्यक्ष, वृक्ष प्राधिकरण समिती हे पद पदसिद्ध असून कलमान्वये प्राप्त अधिकार आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना प्रदान करण्याची तरतूद महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ मध्ये नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)