शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात जमावबंदी?

By admin | Updated: March 31, 2016 02:54 IST

अपुऱ्या, अनियमित पाणीपुरवठ्यामुळे आणि अनेक भागांतील तीव्र पाणीटंचाईमुळे उल्हासनगरमध्ये ठिकठिकाणी आंदोलने, मारहाणीच्या घटना, ठिय्या, उपोषणे सुरू आहेत.

उल्हासनगर : अपुऱ्या, अनियमित पाणीपुरवठ्यामुळे आणि अनेक भागांतील तीव्र पाणीटंचाईमुळे उल्हासनगरमध्ये ठिकठिकाणी आंदोलने, मारहाणीच्या घटना, ठिय्या, उपोषणे सुरू आहेत. पाण्याच्या पळवापळवीच्या घटनाही घडत आहेत. परिस्थिती क्षणोक्षणी गंभीर बनत आहे. पोलीस बंदोबस्तात पालिका कर्मचारी सध्या काम करीत आहेत. ही स्फोटक परिस्थिती लक्षात घेऊन शहरात जमावबंदी लागू करावी, अशी मागणी राज्य सरकारकडे करीत असल्याचे संकेत आयुक्त मनोहर हिरे यांनी दिले. शहरातील उंचावरील जलकुंभांचा ताबा नगरसेवकांसह तथाकथित समाजसेवक आणि कार्यकर्त्यांनी घेतला आहे. तेथे सीसीटीव्ही बसवण्याची मागणी आहे. मात्र, पाण्याच्या टाक्यांचाच ताबा घेतल्याने अनेक भागांत पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे टंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनते आहे. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत आहे. वेगवेगळे उपाय करूनही परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने समाजकंटकांचा उपद्रव वाढल्याने उल्हासनगरमध्येही जमावबंदी लागू करण्याच्या निष्कर्षाप्रत आयुक्त येऊन ठेपले आहेत. (प्रतिनिधी)मनसेसोबत चर्चाउल्हासनगरात जलकुंभांद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करीत मनसेने शोले स्टाइल ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर, प्रभागातील नागरिकांसह पालिका अधिकारी उपोषणकर्त्यांशी गुरुवारी चर्चा करणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.नगरसेवकांनी मागितले पोलीस संरक्षणभाजपाचे नगरसेवक हरेश जग्यासी यांच्या घरावर प्रभागातील नागरिकांनी बुधवारी पाण्यासाठी मोर्चा काढला. मोर्चातील काहींनी त्यांना मारहाणीची धमकी दिल्याने जग्यासी आणि भाजपाच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी केली आहे. खेमानी नाल्याचे काम सुरूमहापालिकेने ३२ कोटींच्या निधीतून खेमानी नाल्याचा प्रवाह वळवण्याचे काम सुरू केले आहे. शहरातील सांडपाणी, रासायनिक पाणी वाहून नेणारा हा खेमानी नाला उल्हास नदीला थेट जाऊन मिळत असल्याने प्रदूषण वाढते आहे. त्यामुळे त्याचा प्रवाह बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पालिका काढते आहे जलपर्णी उल्हासनगरसह कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, ग्रामीण परिसर, भार्इंदर, भिवंडी आदी पालिकांना उल्हास नदीतून पाणीपुरवठा होत आहे. नदीतील जलपर्णी काढण्याचे काम सर्व पालिकांसह पाटबंधारे विभाग व एमआयडीसी यांचे आहे. असे असताना फक्त उल्हासनगर पालिका लाखो रुपये खर्च करून जलपर्णी काढत असल्याची माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली.