शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन फार्मसीविरोधात आज बंद

By admin | Updated: May 30, 2017 05:02 IST

आॅनलाईन फार्मसीविरोधात औषध विक्रेते ३० मे रोजी एक दिवसाचा देशव्यापी बंद पाळणार आहेत. त्या दिवशी रुग्णालयाशेजारची

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण: आॅनलाईन फार्मसीविरोधात औषध विक्रेते ३० मे रोजी एक दिवसाचा देशव्यापी बंद पाळणार आहेत. त्या दिवशी रुग्णालयाशेजारची औषधाची दुकाने सुरु राहणार आहेत. राज्यातील ५५ हजार, ठाणे जिल्ह्यातील पाच हजार आणि कल्याण-डोंबिवलीतील ७०० औषध विक्रेत बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती केमिस्ट असोशिएशन आॅफ ठाणे डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष दिलीप देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी असोशिएशनचे चिटणीस विजय सुराणा, कल्याणचे अध्यक्ष विनय खटाव उपस्थित होेते. आॅनलाईन व ई फार्मसीमुळे झोपेच्या गोळ््या, ड्रग्ज आणि गर्भपाताची औषधे सहज विकत घेतली जाऊ शकतात. त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. त्यामुळे आॅनलाईन व ई फार्मसी औषध विक्रीला विक्रेत्यांचा विरोध आहे. आॅनलाईन विक्रीत डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे विकत घेतली जाऊ शकतात. त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर ई फार्मसीमध्ये बनावट औषधे विकली जाण्याचा धोका जास्त आहे. आॅनलाईन व ई फार्मसीत डॉक्टरांची चिठ्ठी योग्य आहे की नाही, याची तपासणी करणारी यंत्रणा सरकारकडे नाही. आॅनलाईन व ई फार्मसीला विरोध करण्यासाठी विविध औषध विक्रेत्यांनी विरोध दर्शविणारी ५० ते ६० पत्रे सरकारला लिहिली आहेत. औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष व आमदार जगन्नाथ शिंदे यांनी हा प्रश्न संसदेपर्यत नेला. खासदार राजन विचारे व श्रीकांत शिंदे यांनी या मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधले, असे सांगण्यात आले. मुंबईच आझाद मैदानात मूक धरणे धरले जाईल.आॅनलाईन व ई फार्मसीत भरली जाणारी माहिती कितपत सुरक्षित आहे. या माहितीचा गैरवापर केला जाऊ शकतो. आॅनलाईन व ई फार्मसी औषध विक्री ही शहरात केली गेली तरी ग्रामीण भागाला त्याचा मोठा फटका बसू शकतो. तेथे इंटरनेट आॅफलाईन असते. तसेच विजेची समस्या आहे. ग्रामीण भागाला त्याचा काही उपयोग होणार नाही.